Maharashtra College Reopen: राज्यातील महाविद्यालये येत्या 20 ऑक्टोंबर पासून 50 टक्के उपस्थितीसह सुरु होणार
अशातच महाराष्ट्र सरकराने बुधवारी घोषणा करत असे म्हटले की, येत्या 20 ऑक्टोंबर पासून महाविद्यालये पुन्हा सुरु केली जाणार आहे.
Maharashtra College Reopen: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच महाराष्ट्र सरकराने बुधवारी घोषणा करत असे म्हटले की, येत्या 20 ऑक्टोंबर पासून महाविद्यालये पुन्हा सुरु केली जाणार आहे. परंतु ऑफलाइन वर्ग अशा विद्यार्थ्यांसाठी असणार ज्यांनी कोविडच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील. या संबंधित आदेश ही जाहीर करण्यात आला आहे.(MPSC Exam 2021: राज्यसेवा परीक्षेसंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आल्यास तो परिक्षेसाठी लागू होणार नाही, अफवांवर उमेदवारांनी विश्वास न ठेवण्याचे आवाहन)
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीलाच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतर यांनी असे म्हटले, मी गेल्या एका आठवड्याासून सांगत होते की महाविद्यालये सुरु करण्याची वेळ आली आहे. तर आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोब या मुद्द्यावर चर्चा केली. त्यानुसार येत्या 20 ऑक्टोंबर पासून पुन्हा एकदा महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत येणारी महाविद्यालये ज्यामध्ये युजीसी, पीजी, इंजिनिअरिंग कॉलेजचा समावेश असणार आहे.
सरकारद्वारे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या सुचनेनुसार, विद्यार्थ्याचे लसीकरण झाले नसेल तर युनिव्हर्सिटी आणि महाविद्यालयांनी स्थानिक प्रशासनासोबत बातचीत करुन परिसरात विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबीर आयोजित करावे. सामंत यांनी म्हटले की, या प्रकराचे निर्देशन सर्व युनिव्हर्सिटी आमि कॉलेजला दिले गेले आहेत.(प्रवाशांची वाढती गर्दी पाहता 20 ऑक्टोबर ऐवजी आजपासूनच सुरू झालं मुंबई विमानतळावरील विलेपार्ले चं T1 टर्मिनल)
मंत्र्यांनी पुढे म्हटले की, विभागाच्या मुख्य सचिवांना मुंबईतील कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी मिळावी यासाठी प्रस्ताव पाठवला जाणार आहे. सध्या पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनाच लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली जात आहे.
सामंत यांनी असे म्हटले की, युनिव्हर्सिटी आणि कॉलेजमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण झालेले असावे. तसेच वर्ग सुरु करण्यापूर्वी स्थानिक जिल्हा प्रशासनासोबत सुद्धा चर्चा करावी. त्याचसोबत पालक, विद्यार्थ्यांसह अन्य जणांना कॉलेजमध्ये सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.