Maharashtra Floods 2019: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह कॅबिनेट मंत्र्यांनी पूरग्रस्तांसाठी दान केला महिन्याभराचा पगार; राज्याकडून 6813 कोटींची मदत जाहीर
यामध्ये कॅबिनेटच्या बैठकीत सुमारे 6000 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 4700 कोटी रुपये कोल्हापूर, सांगली व साताऱ्यासाठी तर, उर्वरीत 2105 कोटी कोकण, नाशिक व इतर जिल्ह्यांना मदत म्हणून जाहीर केली आहे
ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. अवघ्या 4 दिवसांमध्ये सुमारे 700% पाऊस झाल्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे भागात पुराच्या पाण्याने थैमान घातलं आहे. 8 दिवसांनंतर हळूहळू पाणी ओसरायला सुरूवात झाल्याने मदत कार्याला आता वेग आला आहे. महाराष्ट्र सरकारने आता पूरग्रस्त भागाचा आढावा घेऊन मदत जाहीर केली आहे. यामध्ये कॅबिनेटच्या बैठकीत सुमारे 6000 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली आहे. यामध्ये 4700 कोटी रुपये कोल्हापूर, सांगली व साताऱ्यासाठी तर, उर्वरीत 2105 कोटी कोकण, नाशिक व इतर जिल्ह्यांना मदत म्हणून जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या आपत्ती निवारण निधीतून भरपाई दिली जाणार आहे. पडझड झालेली घरे पूर्ण बांधून देण्यात येतील, असं आश्वासनदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळेस जनतेला दिले आहे. कोल्हापूर: पूरस्थितीचा फायदा घेत नागरिकांची लूट करणार्या दुकान विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई होणार; 1077 किंवा 2655416 क्रमांकावर करा तक्रार
राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे प्रयत्न सलग नवव्या दिवशी सुरूच आहेत. 5 लाख 60 हजार 953 पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश आले आहे. सांगली,कोल्हापूर येथे NDRF चे 22, SDRF चे 3 , नौदलाचे 18 तटरक्षकदल 8, आर्मीच्या 17 थकांसह 163 बोटी कबचावकार्य करत आहेत. Kolhapur Flood Update: अवजड वाहनांसाठी पुन्हा सुरु करण्यात आला राष्ट्रीय महामार्ग 4
मुख्यमंत्र्यांची पूरग्रस्तांना मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांचा एका महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्याता निधीमध्ये देत पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. Maharashtra Flood 2019: कोल्हापूर, सांगली भागातील पूरग्रस्तांना तुम्ही कशी मदत करू शकाल?
कोल्हापूर, सातारा, सांगली सह कोकणामध्ये पावसाचा जोर आता ओसरला असून पूराचं पाणी कमी होत विस्कळीत झालेलं जनजीवन आता पुन्हा स्थिरस्थावर होण्यास सुरूवात झाली आहे.