Maharashtra Assembly Elections 2019: भाजप पक्षातील सर्वात श्रीमंत उमेदवार मंगल प्रभात लोढा यांच्याकडे 441 करोडची संपत्ती

तर भाजप (BJP) पक्षाकडून मुंबईतील मलबार हिल (Malabar Hills) येथून प्रभात लोढा (Prabhat Lodha) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तत्पूर्वी प्रभात लोढा यांनी विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्याकडे असलेल्या एकूण संपत्तीचा उलगडा केला आहे.

मंगल प्रभात लोढा (Photo Credits-ANI)

Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांची यादीची घोषणा पक्षांकडून करण्यात येत आहे. तर भाजप (BJP) पक्षाकडून मुंबईतील मलबार हिल (Malabar Hills) येथून मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तत्पूर्वी प्रभात लोढा यांनी विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्याकडे असलेल्या एकूण संपत्तीचा उलगडा केला आहे. लोढा यांच्याकडे तब्बल 441 करोड रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. दक्षिण मुंबईच्या सर्वाधिक श्रीमंत भाग मलबार हिल येथून प्रभात लोढा पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर यंदाच्या निवडणूकीसाठी त्यांना सहाव्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे.

मंगळवारी प्रभात लोढा यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. या अर्जात लोढा यांनी त्यांच्याकडे आणि पत्नीकडे जवळजवळ 252 करोड रुपयांपेक्षा अधिक चल संपत्ती आणि 189 करोड रुपयांची अचल संपत्ती असल्याचे दाखवले आहे. त्यातसोबत 14 लाख किंमतीची आलिशान जॅग्वार गाडीसह बॉन्ड आणि शेअरमध्ये गुंतणुक केली असल्याचे म्हटले आहे.(Maharashtra Assembly Election 2019: विधानसभा निवडणुकांनिमित्त महाराष्ट्रात नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या सभांचा धडाका; सीएम देवेंद्र फडणवीस घेणार तब्बल 65 सभा)

लोढा परिवार यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय असून दक्षिण मुंबईत त्यांचे पाच फ्लॅट आहेत. तसेच राजस्थान येथे ही एक फ्लॅट असून मलबार हिल येथे ही एक घर आहे. एवढेच नाही तर पत्नीकडे अजून एक फ्लॅट आणि दक्षिण मु्ंबईत एक व्यावसायिक संपत्ती सुद्धा आहे. अर्जाच्या मते लोढा यांच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्रात येत्या 21 ऑक्टोंबरला विधानसभा निवडणूक होणार असून त्याचा निकाल 24 ऑक्टोंबरला लागणार आहे.

तर दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांनी असे म्हटले आहे की, भाजप पक्षाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत नितेश राणे यांचे नाव असणार आहे. नितेश राणे यांनी 2014 मध्ये विधानसभा निवडणूकीवेळी काँग्रेसकडून त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी नितेश राणे यांनी भाजप आमदार प्रमोद जठार यांना हरवत विजय मिळवला होता.