Maharashtra Assembly Election 2019: विधानसभेसाठी मनसेची 32 जणांची तिसरी यादी जाहीर; पक्षाकडून आतापर्यंत 104 उमेदवार रिंगणात
मनसेने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुख्यतः मुंबईमधील मतदारसंघांचा समावेश आहे. या यादीमध्ये मनसेने एकूण 32 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2019) तारखा जाहीर झाल्यानंतर युतीच्या चर्चांना उधाण आले. त्यानंतर आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या शेवटचा दिवस शिल्लक असताना पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. या निवडणुकीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्षही (MNS) मोठ्या ताकदीनिशी उतरत आहे. मनसेने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुख्यतः मुंबईमधील मतदारसंघांचा समावेश आहे. या यादीमध्ये मनसेने एकूण 32 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
'महाराष्ट्र विधानसभा २०१९ सार्वत्रिक निवडणुकीसाठीची' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची तिसरी यादी... pic.twitter.com/nYsLoWpvIx
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 3, 2019
मनसेने आतापर्यंत एकूण 104 उमेदवार जाहीर केले आहेत, त्यामुळे मनसे 100 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा अंदाज खरा ठरला आहे. आजच्या तिसऱ्या यादीतही वरळी मतदारसंघाचे नाव नाही. दरम्यान धडाकेबाज आणि विविध आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेले मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे मनसेला फार मोठा धक्का बसला आहे. नितीन नांदगावकर यांना मनसेचेकडून विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळणार होते. (हेही वाचा: Maharashtra Assembly Election 2019: विधानसभेसाठी मनसेची 45 जणांची दुसरी यादी जाहीर; पक्षाकडून आतापर्यंत 72 उमेदवार रिंगणात)
सोमवारी मुंबई येथे पार पडलेल्या मनसेच्या मेळाव्यात राजसाहेब ठाकरे यांनी पक्षाचे नेते, सरचिटणीस, सचिव, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व विधानसभा 2019 निवडणूकीच्या पक्षाच्या संभाव्य उमेदवारांना मार्गदर्शन केले. यावरून मनसे मोठ्या ताकदीनिशी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र मनसेच्या तिसऱ्या यादीमध्येही नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर अशा दोन महत्वाच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला नाही.
(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2019 09:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

