लोणावळा येथील भुशी धरण ओवरफ्लो, पर्यटकांना सतर्कतेचा इशारा
राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा (Lonavala) येथील भुशी धरण (Bhushi Dam) ओवरफ्लो झाले आहे.
राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा (Lonavala) येथील भुशी धरण (Bhushi Dam) ओवरफ्लो झाले आहे. यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. त्याचसोबत भुशी धरणाचा परिसर हिरवागार झाला असून धुक्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.
लोणावळ्यात पावसाचा आनंद लुटण्यासाठी बऱ्याच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. तसेच येथील हिरव्यागार अशा निसर्गाच्या सानिध्यात पर्यटक सुट्टीचा आनंद घेताना दिसून येतात. त्याचसोबत लोणावण्यात विविध ठिकाणी धरणे असून तेथेसुद्धा पर्यटकांची गर्दी होती. परंतु वाढत्या गर्दीमुळे लोणावळ्यात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.
(मुंबई मरिन ड्राइव्ह येथे दोनजण बुडाल्याने खळबळ; पोलिसां सह नौसेनेचे जवान घटनास्थळी दाखल)
डोंगरभागात भरपूर प्रमाणात पाऊस झाल्याने 600 मीमी पर्यंतच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर भुशी धरणाची पातळी वाढत चालली असल्याने पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.