कोण हे पार्थ पवार, सुजय विखे-पाटील? अन त्यांचं कर्तृत्व काय? विजय शिवतरे यांनी डागली तोफ

परंतू, दोघांनीही आगोदर किमान दहा वर्षे तरी पक्षात आणि समाजात काम करण्याची आवश्यकता होती. त्यानंतरच पक्षाने त्यांच्या उमेदवारीबाबात विचार करायला हवा अशी भावनाही शिवतारे यांनी व्यक्त केली.

Sujay Vikhe-Patil, Parth Pawar | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Lok Sabha Elections 2019: विधानस सभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू, अजित पवार ( Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांची लोकसभा निवडणूक 2019 साठीची संभाव्य उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे. जलसंपदा मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी तर या दोघांच्याही संभाव्य उमेदवारीवरुन थेट टीका करत कोण हे पार्थ पवार आणि सुजय विखे-पाटील? त्यांचे कर्तृत्व काय? केवळ राज्यातील राजकारणातील नेत्यांची मुलं म्हणून त्यांचा पक्षप्रवेश करुन त्यांना उमेदवारी देणार काय? असा वास्तववादी सवाल विचारला आहे.

वाऱ्याची दिशा कळल्यानेच पवार यांची माढा येथून माघार

पुणे येथे वैशाली हॉटेल कट्ट्यावर शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी गप्पा मारताना त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. या वेळी त्यांनी शरद पवार यांना वाऱ्याची दिशा बरोबर कळते. त्यामुळे वाऱ्याची दिशा पाहूनच त्यांनी माढा मतदारसंघातून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे शिवतारे यांनी म्हटले.

नेत्यांच्या मुलांनी पक्ष आणि समाजासाठी किमान 10 वर्षे काम करावे

पार्थ पवार असोत किंवा सुजय विखे-पाटील त्यांच्या उमेदवारीबाबत विचार करायला हरकत नाही. परंतू, दोघांनीही आगोदर किमान दहा वर्षे तरी पक्षात आणि समाजात काम करण्याची आवश्यकता होती. त्यानंतरच पक्षाने त्यांच्या उमेदवारीबाबात विचार करायला हवा अशी भावनाही शिवतारे यांनी व्यक्त केली. (हेही वाचा, मावळ लोकसभा मतदारसंघ: पार्थ पवार यांच्यासमोर लोकसभा निवडणूक 2019 मध्ये विजयासाठी ही आहेत आव्हानं)

सायकल, श्रवण यंत्र, चप्पल वाटणे म्हणजे खासदर म्हणून काम करणे नव्हे.

दरम्यान, शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. बारामती लोकसभा मतदारसंघात एक खासदार म्हणून सुप्रीया सुळे या केव्हाच अपयशी ठरल्या आहेत. केवळ सायकल, श्रवण यंत्र, चप्पल वाटणे म्हणजे खासदर म्हणून काम करणे नव्हे. 2014च्या लोकसभा निवडणूकीत सुप्रीया सुळे पराभूतच होत होत्या. मात्र, केवळ बारामती तालुक्यातून त्यांना मतांची आघाडी मिळाल्यामुळे त्यांना विजयापर्यंत मजर मारता आली, असेही शिवतारे यांनी या वेळी सांगितले.