Bank Loans For Ladki Bahin Scheme Beneficiaries: आता लाडक्या बहिणींना लवकरच 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार; अजित पवार यांची मोठी घोषणा

या उपक्रमाच्या विस्ताराबाबत बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, सरकार महिलांना, विशेषतः ज्यांना स्वावलंबी व्हायचे आहे किंवा ज्यांना स्टार्टअपसाठी भांडवलाची कमतरता आहे त्यांच्यासाठी व्यवसाय कर्ज सुलभ करण्याच्या प्रस्तावावर सक्रियपणे काम करत आहे.

Bank Loans For Ladki Bahin Scheme Beneficiaries: आता लाडक्या बहिणींना लवकरच 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार; अजित पवार यांची मोठी घोषणा
Ajit Pawar | (Photo Credit- X)

Bank Loans For Ladki Bahin Scheme Beneficiaries: लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी (Ladki Bahin Scheme Beneficiaries) अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, आता या महिलांना लघु उद्योग सुरू करण्यास मदत करण्यासाठी 40 हजार रुपयांपर्यंतचे बँक कर्ज मिळू शकते, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत, राज्य सरकार महाराष्ट्रातील महिलांना मदत करण्यासाठी दरवर्षी सुमारे 45 हजार कोटी खर्च करते. या उपक्रमाच्या विस्ताराबाबत बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, सरकार महिलांना, विशेषतः ज्यांना स्वावलंबी व्हायचे आहे किंवा ज्यांना स्टार्टअपसाठी भांडवलाची कमतरता आहे त्यांच्यासाठी व्यवसाय कर्ज सुलभ करण्याच्या प्रस्तावावर सक्रियपणे काम करत आहे.

यासंदर्भात बोलताना अजित पवार यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहिन लाभार्थ्यांना सूक्ष्म उद्योग स्थापन करण्यासाठी बँका 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज देतील आणि एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, मासिक ईएमआय (कर्ज हप्ता) सरकार लाडकी बहिन योजनेअंतर्गतच कव्हर केला जाईल. सरकारची याबाबत सहकारी आणि प्रादेशिक बँकांशी चर्चा सुरू आहे. (हेही वाचा - Ajit Pawar On Pahalgam Terror Attack: 'पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय भारत शांत बसणार नाही'; पुण्यात अजित पवारांचे मोठे वक्तव्य)

लाडकी बहिण योजना बंद होणार नाही - अजित पवार

दरम्यान, यावेळी अजित पवार यांनी लाभार्थ्यांना आश्वासन दिले की ही योजना बंद केली जाणार नाही. राजकीय विरोधकांनी पसरवलेल्या अफवांना बळी पडू नका असे आवाहनही अजित पवार यांनी केले. तथापि, जरी हप्ता जमा होण्यास विलंब झाला तरी, पैसे न चुकता तुमच्या खात्यात येत राहतील, असं आश्वासनही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिलं. (वाचा - Ajit Pawar आज सहाव्यांदा घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ; 4 मुख्यमंत्र्यांसोबत सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम करणारे ठरले एकमेव नेते!)

या योजनेचा व्यापक दृष्टिकोन अधोरेखित करताना अजित पवार यांनी सांगितलं की, जर एखाद्या महिलेला 50 हजार भांडवल मिळाले तर ती स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकते. यामुळे केवळ व्यक्तीच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे कल्याण होईल. या व्यतिरिक्त, पवार यांनी राज्याच्या वीज अनुदानाचा भार दरमहा 20 हजार कोटी कमी करण्याच्या प्रयत्नांवरही प्रकाश टाकला. याशिवाय, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी सौर पॅनेल बसवणे अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी नमूद केले.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).