Lok Sabha Election Results 2019: निलेश राणे, शिवसेनेचे अनंत गिते पिछाडीवर; विनायक राऊत, राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे आघाडीवर; पाहा महाराष्ट्रातून कोकण विभागातील मतमोजणी कल

महाराष्ट्र आणि देशभरातील विविध मतदारसंघातून येणारी आकडेवारी ही प्रातिनिधिक आहे. ती सतत बदलणारी असते. अखेरचा निकाल हाती येईपर्यंत कोणत्याही जागेबद्दलचा स्पष्ट अंदाज बांधता येत नाही. वेळोवेळी येणारी आकडेवारी आणि निकाल आपल्याला आम्ही सतत सांगत राहणार आहोत.

(Photo credit: archived, modified, representative image)

Lok Sabha Election Results 2019:  लोकसभा निवडणूक 2019 साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (गुरुवार, 23 मे 2019) सुरु आहे. महाराष्ट्रासह देशभरातून धक्कादायक म्हणावेत असे निकाल हाती येत आहेत. महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातूनही हे निकाल धक्कादायक असेच आहेत. पश्चिम महाराष्ट्रानंतर महाराष्ट्रातील कोकण प्रदेशातील मतमोजणीचे कल पाहता काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी धक्कादायक निकाल हाती येत आहेत.

पालघर लोकसभा मतदारसंघ

शिवसेना - राजेंद्र गावित आघाडी

काँग्रेस - सुरेश पडवी - पिछाडी

VBA - बाळाराम पाटील - पिछाडी

रायगड लोकसभा मतदारसंघ

राष्ट्रवादी - सुनिल तटकरे - आघाडी

शिवसेना - अनंत गिते - पिछाडी

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

शिवसेना - विनय राऊत

स्वाभिमानी पक्ष - निलेश राणे - पिछाडीवर

काँग्रेस - नविनचंद्र बांदोडकर - पिछाडीवर

दरम्यान, महाराष्ट्र आणि देशभरातील विविध मतदारसंघातून येणारी आकडेवारी ही प्रातिनिधिक आहे. ती सतत बदलणारी असते. अखेरचा निकाल हाती येईपर्यंत कोणत्याही जागेबद्दलचा स्पष्ट अंदाज बांधता येत नाही. वेळोवेळी येणारी आकडेवारी आणि निकाल आपल्याला आम्ही सतत सांगत राहणार आहोत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement