कोल्हापूर: वधूची शेणाने सारवलेल्या गाडीतून नवऱ्याच्या घरी पाठवणी
मात्र कोल्हापूर येथे चक्क वधूची नवऱ्याकडे पाठवणी शेणाने सारवलेल्या गाडीतून करण्यात आली आहे.
लग्न झाल्यानंतर वधुची पाठवणी सुंदर फुलांनी सजवलेल्या गाडीतून केली जाते. मात्र कोल्हापूर येथे चक्क वधूची नवऱ्याकडे पाठवणी शेणाने सारवलेल्या गाडीतून करण्यात आली आहे. तर पाहुण्यांनी प्रथम शेणाने सारवलेली गाडी पाहिली असता त्यांना धक्काच बसला आणि त्यामागील कारण कळणे सुद्धा त्यांना कठीण होऊन बसले होते.
नवनाथ दुधाळ हे पेशाने डॉक्टर आहेत. त्यांच्या मुलीचा लग्नसोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. या लग्नासाठी मोठ्या संख्येने पाहुण्यांची रेलचेल सुरु झाली होती. मात्र लग्नसभागृहाच्या बाहेर शेणाने सारवलेल्या गाडीमुळे त्यांना नेमकी काय भानगड आहे हे समजणे कठीण झाले होते. तर दुधाळ यांना शेणाने गाडी सारवण्यामागील कारण विचारले. यावर त्यांनी असे म्हटले की, कॅन्सरसारख्या भयावह आजार माणसाला होत आहे. मात्र प्रत्येक रोगावर उपाय म्हणून शेण उपयुक्त असल्याने त्यांनी गाईच्या शेणाची संधी साधून गाडीला लावले असल्याचे स्पष्ट कले आहे.(कोल्हापुरातील मटनाचा वाद न्यायालयात; ग्रामपंचायत व जिल्हाधिकाऱ्यांना कोर्टाची नोटीस)
यापूर्वी पुण्याचे रहिवाशी नवनाथ दुधाळ हे मुंबईतील टाटा कॅन्सर (Tata Cancer) हॉस्पिटल मध्ये डॉक्टर असणाऱ्या नवनाथ यांनी आपल्या Mahindra XUV500 गाडीला शेणाने सारवले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार यामुळे गाडीचे तापमान बाहेरील तापमानापेक्षा 5 ते 7 डिग्री कमी राहायला मदत झाली आहे. गाडीला शेण सारावण्याची कल्पना एक पर्यावरणाला पूरक आहे, यामुळे गाडीचे तापमान इतके थंड होते की मला गाडीत एसी वापरायची देखील गरज भासत नाही. पुण्यात उन्हामुळे अंगाची अक्षरशः ल्हाई ल्हाई होत असताना देखील , पण शेणाने सारवल्याने इतक्या उन्हाचा गाडीवर काहीच परिणाम पडत नाहीये असे म्हटले होते.