Kirit Somaiya यांनी केला 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप; मंत्री Hasan Mushrif करणार 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

हा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, मी हसन मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्याचे पूर्ण पुरावे आयकर विभागाला दिले आहेत

Hasan Mushrif | (File Image)

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. हा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, मी हसन मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्याचे पूर्ण पुरावे आयकर विभागाला दिले आहेत. जे सुमारे 2700 पानांचे आहे. यावर मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली, ते म्हणाले की, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप पूर्पपणे खोटे आहेत. मी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केलेला नाही. ते पुढे म्हणाले की, येत्या दोन आठवड्यांमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर कोल्हापूर सत्र न्यायालयात मी फौजदारी 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे.

किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. सोमय्या म्हणाले की, मुश्रीफ यांची पत्नी साहिरा हसन मुश्रीफ यांच्या नावाने संताजी घोरपडे शुगर मिलमध्ये 3 लाख 78 हजार शेअर्स दाखवण्यात आले आहेत. मुश्रीफ यांच्यावर सीआरएम सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या शेल कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप आहे. काही वर्षांपूर्वी हसन मुश्रीफ कुटुंबावर आयकर छापे टाकण्यात आले होते.

पत्रकार परिषदेमध्ये मुश्रीफ म्हणाले की, ‘सोमय्या यांनी केलेल्या आरोपाबाबत मी त्यांचा तीव्र निषेध करतो. सोमय्या यांनी दाखवलेली सर्व कागदपत्रे ही आरओसी साईटवर आधीपासूनच उपलब्ध आहेत. ती आम्ही अपलोड केली आहेत. जर ती खोटी असती तर आम्ही ही गोष्ट लपवू शकलो असतो. शिवाय निवडणुकीची प्रतिज्ञापत्रे देखील नेटवर उपलब्ध असतात. त्यामुळे सोमय्या यांनी कागदपत्रे गोळाकरून करून नवीन केलेले आरोप अतिशय बिनबुडाचे आहेत.’ (हेही वाचा: 'हवेत गोळीबार करू नका' चंद्रकांत पाटील यांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया)

यापूर्वी किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर बेकायदा बांधकाम आणि जमीन बळकावल्याचा आरोप केला आहे. याशिवाय भावना गवळी, रवींद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, यशवंत जाधव, यामिनी जाधव यांच्यावरही घोटाळ्याचे आरोप आहेत.



संबंधित बातम्या

Nawab Malik Slams BJP: नवाब मलिकांचा भाजपवर हल्लाबोल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कायदेशीर मान्यता

BAN vs SA 2nd Test 2024 Day 3 Live Streaming: थोड्याच वेळात सुरु होणार तिसऱ्या दिवसाचा खेळ, बांगलादेशने 4 गडी गमावून केल्या 39 धावा; कधी, कुठे आणि कसा घेणार थेट सामन्याचा आनंद घ्या जाणून

Bangladesh vs South Africa, 2nd Test Day 3 Preview: बांगलादेशचे फलंदाज लढणार की आफ्रिकन गोलंदाज पुन्हा एकदा करणार कहर, हवामान स्थिती, खेळपट्टीचा अहवाल, मिनी लढाई आणि लाईव्ह स्ट्रिमींगचा सर्व तपशील घ्या जाणून

Bangladesh vs South Africa, 2nd Test Day 2 Full Highlights: दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण अफ्रिकेकडे 537 धावांची आघाडी, बांग्लादेश 4 बाद 38 धावा; दुसऱ्या दिवसाच्या खेळाचे व्हिडिओ हायलाईट्स पहा इथे