Job Recruitment: पनवेल महानगरपालिकेत विविध पदांसाठी नोकरभरती; जाणून घ्या पदांची नावे, पात्रता, पगार

या अंतर्गत 52 जागा भरल्या जातील

(Photo credit: archived, edited, representative image)

पनवेल महानगरपालिकेमधील (Panvel Corporation) राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत (NUHM) नागरी प्राथमीक आरोग्य केंद्रातील खालील संवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने (11 महिन्यांसाठी) भरण्यात येणार आहेत. उमेदवाराच्या नेमणुका उपसंचालक आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे यांचे स्तरावरुन थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहेत. थेट मुलाखती उपजिल्हा रुग्णालय व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च प्लॉट क्रमांक 6 आणि 6A, सेक्टर 18,  खांदा कॉलनी, पनवेल जि. रायगड येथे घेण्यात येणार आहेत. पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्यसेविका, LHV, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या 6 पदांसाठी ही नोकरभरती होणार आहे. या अंतर्गत 52 जागा भरल्या जातील.

तपशील-

पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी-

वयोमर्यादा – 45 वर्षे

शैक्षणिक पात्रता- MBBS

पगार- 60,000

अधिपरिचारिका-

वयोमर्यादा – 38 वर्षे

शैक्षणिक पात्रता- 12 वी उत्तीर्ण, GNM/ B.Sc. नर्सिंग

पगार- 20,000

आरोग्यसेविका-

वयोमर्यादा – 38 वर्षे

शैक्षणिक पात्रता- 10 वी उत्तीर्ण, ANM

पगार- 18,000

LHV-

वयोमर्यादा – 38 वर्षे

शैक्षणिक पात्रता- 12 वी उत्तीर्ण, GNM/ B.Sc. नर्सिंग

पगार- 20,000

प्रयोगशाळा तंत्रज्ञ-

वयोमर्यादा – 38 वर्षे

शैक्षणिक पात्रता- 10 वी उत्तीर्ण, DMLT

पगार- 17,000

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी-

वयोमर्यादा – 65 वर्षे

शैक्षणिक पात्रता- MBBS

पगार- 30,000

अर्ज करण्याची मुदत – 13 मे 2022

प्राप्त अर्जाची संबधित उमेदवारांच्या व्यावसायीक पदवी/पदवीका आधारे तसेच अतिरिक्त पदवी/पदवुत्तर पदवी व अनुभव याच्या आधारे छाननी करुन, पात्र उमेदवारांची यादी पनवेल महानगरपालिका संकेतस्थळावर दिनांक 16 मे, 2022 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. त्यानुसार पात्र उमेदवारांच्या मुलाखती 18 मे 2022 ते 20 मे 2022 या दरम्यान होणार आहेत. (हेही वाचा: 922 नॉन एक्झिक्युटीव्ह पदांसाठी नोकरभरती जाहीर; ongcindia.com वर 28 मेपूर्वी करा अर्ज)

मुलाखतीसाठी येताना विहीत नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक अहर्ता बाबतची प्रमाणपत्र गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मतारखेचा दाखला, प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, शासकीय अनुभवलेले अनुभव दाखला, नावात बदल असल्यास पुरावा अशी मुळ कागदपत्रे सोबत न्यावीत. तसेच विहीत नमुन्यातील अर्जासोबत या कागदपत्रांचा एक साक्षाकिंत झेरॉक्स प्रती जोडण्यात याव्यात.

अधिक माहितीसाठी या ठिकाणी नोकरभरतीची जाहिरात पहावी