Jayakwadi Dam Water Level: जायकवाडी धरणाचा पाणीसाठा वाढला, पाण्याची आवक घटली

यानंतर सप्टेंबर महिन्यात 20 तारखेनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आता काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Jyakwadi Dam

राज्यात सुरुवातीपासून पावसाने दडी  मारल्यानंतर शेतकरी संकटात आला होता. यानंतर संप्टेंबरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने राज्यातील पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) सुद्धा पाण्याची आवक सुरु असून, पाणीपातळी वाढतांना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वरील धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु आहे. जायकवाडी धरणात आजघडीला 45.18 टक्के पाणीसाठा असून, 7 हजार 749 क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे.  23 सप्टेंबरला 19 हजार क्युसेकने सुरु असलेली पाण्याची आवक आता घटून, 7 हजारांवर आली आहे.  (हेही वाचा - Mumbai-Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर वाहतुक ठप्प, रत्नागिरी निवळी येथे दरड कोसळली)

पावसाने उशीरा हजेरी लावल्याने जायकवाडी धरणात पाण्याची आवक घटली होती. यानंतर सप्टेंबर महिन्यात 20 तारखेनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आता काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, जायकवाडीत देखील आवक सुरु झाली आहे. मात्र, असे असले तरी अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने, विभागातील अनेक भागात पाणी टंचाई पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजही काही गावांना पिण्यासाठी टँकरने पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे.

मागील तीन वर्षांपासून जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरत असल्याने मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचा पिण्याचा पाण्याचा, शेतीचा आणि उद्योजकांच्या पाण्याच्या प्रश्न मिटल्याचे पाहायला मिळायचे. मात्र, यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने जायकवाडी धरणात सुद्धा पाण्याची विशेष आवक झाली नाही. त्यामुळे, धरणात सध्या आजघडीला 45.18 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif