Indian Banks Safe: भारतीय बँका सुरक्षीत, सिलिकॉन व्हॅली बंद होण्याचा काहीही परिणाम नाही-मूडीज

सहाजिकच भारतीय बँकींग क्षेत्रातही याबाबत चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, मूडीजने भारतीय गुंतवणूकदार आणि बँकींग क्षेत्राला काहीसे आश्वस्त केले आहे.

Moody's (Photo Credits: ANI)

यूएसमधील सिग्नेचर (Signature Bank) आणि सिलिकॉन व्हॅली (Silicon Valley Bank ) या दोन बँका बंद झाल्याने जागतीक बँकीग आणि गुंतवणूक क्षेत्रामध्ये काळजीचे वातावरण आहे. सहाजिकच भारतीय बँकींग क्षेत्रातही याबाबत चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, मूडीजने भारतीय गुंतवणूकदार आणि बँकींग क्षेत्राला काहीसे आश्वस्त केले आहे. सिलिकॉन व्हॅली आणि सिग्नेचर या बँकांना अपयश आल्याने त्या बंद झाल्या असल्या तरी त्याचा भारतीय बँकींग (Indian Banks Safe) सेक्टरवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मुडीजने म्हटले आहे. युएसमध्ये कोसळलेल्या बँका मोठ्या असल्या तरी त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादीत असल्याचे मुडीजने म्हटले आहे.

मूडीजने पुढे म्हटले आहे की, यूएसमधील दोन बँका आणि एपीएसी क्षेत्रातील इतर वित्तीय संस्थांवर रचनात्मक प्रभाव फारच कमी असेल. प्रामुख्याने बहुतांश APAC संस्था या सिग्नेचर आणि सिलिकॉन व्हॅली या बँकांशी संबंधित अथवा त्यांच्या संपर्कात नाहीत. त्या बँकांकडे स्वत:चे एक्सपोजर आहे. त्यामुळे सिलिकॉन व्हॅली बँकेइतके बहुतेक संस्था कर्ज सुरक्षा होल्डिंग्समधून मोठ्या नुकसानास बळी पडत नाहीत. APAC क्षेत्रातील रेटींग झालेल्या बँकांना दिला जाणारा बहुतांश निधी हा ग्राहकांच्या ठेवींमधून दिला जातो. तसेच, या बँकांची कर्जे त्यांच्या बाजारातील मालमत्चेच्या सरासरी 16% इतकी माफक असतात. त्यामुळे फारसे चिंतेचे कारण नाही.

APAC मधील बहुतेक प्रणालींमध्ये, बॅंकांची होल्ड-टू-मॅच्युरिटी (HTM) साधनांमधील गुंतवणूक सामान्यतः मूर्त सामान्य इक्विटीच्या तुलनेत लक्षणीय नसते. मात्र मोठ्या प्रमाणावर अवास्तव नुकसान सहन कराव्या लागलेल्या सिलिकॉन व्हॅली बँकेच्या बाबतीत हे घडले. त्याचा फटकाही त्यांना बसला. इतर बँकांबद्दल बोलायचे तर एचटीएम सिक्युरिटीजवरील वाजवी मूल्याचे नुकसान बहुतेक APAC बँकांसाठी माफक असेल, असे मुडीजने म्हटले.