Mumbai Accident: वांद्रे येथे दुचाकीला डंपरची धडक, तरुणाचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल
या अपघातात एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. एका डंपरने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. हा अपघात शुक्रवारी रात्री घडला.
Mumbai Accident: वांद्रे पूर्व येथील बीकेसी नाबार्ड जंक्शनजवळ दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. एका डंपरने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. हा अपघात शुक्रवारी रात्री घडला. या अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता. अपघातानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. (हेही वाचा- माधापूर येथे रस्ता ओलांडताना बसची धडक, तरुणीचा जागीच मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, बीकेसी येथील नाबार्ड जंक्शनवर रस्ता दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यावेळीस दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावले होते. त्यामुळे वाहनांची गती मंदावली होती. अरुंद रस्त्यामुळे संथ गतीने जात असलेला डंपरने दुकाचाकीला धडकली. मोहम्मद अहद जावेद अन्सारी असं अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. डंपरच्या धडकेत अन्सारी याचा भीषण अपघात झाला. दुचाकीवर अन्सारी थेट दुसऱ्या रस्त्यावर पडला. तो गंभीर जखमी झाला. त्याला स्थानिकांनी कुर्ल्यातील बहादूर भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिची पोलिसांना दिली. पोलिसांनी डंपर चालकावर गुन्हा दाखल केला. मृत तरुणाच्या भावाने पोलिसांना सांगितले की, अन्सारी कबाब घेण्यासाठी दुचाकीवरून गेला होता त्यावेळीस हा अपघात घडला.