HSC Board Exam 2019 Timetable: 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार बारावीची परीक्षा, PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा बारावीच्या परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक, mahahsscboard.maharashtra.gov.in वर अधिक माहिती
बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2019 ते 20 मार्च 2019 या कालावधीमध्ये पार पडेल.
MSBSHSE HSC Board Exam 2019 Timetable: विद्यार्थ्यांच्या करियर निवडीमध्ये दहावी (SSC) आणि बारावीची परीक्षा (HSC ) महत्त्वाची भूमिका पार पडते. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा येत्या 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राज्यभरातून विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांना हॉल तिकीटं उपलब्ध करण्यात आली आहेत. आता अवघ्या काही दिवसांवर बारावीची परीक्षा येऊन ठेपली आहे. या परीक्षेची लास्ट मिनिटं उजळणी आणि तुमच्या अभ्यासाचं वेळापत्रक आखत असाल तर कोणत्या दिवशी कोणत्या विषयाचा पेपर आहे ? दोन विषयांमध्ये किती दिवसांची सुट्टी आहे? हे तपासून पहा. शिक्षण मंडळाने mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवर परीक्षेची सविस्तर माहिती, वेळापत्रक दिलं आहे. MSBSHSE च्या बारावीच्या परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक तुम्हांला एका क्लिकमध्ये डाऊनलोड करता येऊ शकतं. आता जिल्हा स्तरावरही चमकदार कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांना SSC, HSC परीक्षेत मिळणार वाढीव गुण
शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर आता अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2019 ते 20 मार्च 2019 या कालावधीमध्ये पार पडेल. तर दहावीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च 2019 या दिवसांमध्ये महाराष्ट्रभर होईल. Open SSC Exam : दिव्यांग, कलाकार आणि खेळाडू विद्यार्थी शाळेशिवाय देऊ शकणार दहावीची परीक्षा
राज्यामध्ये पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या विभागातून विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.