मुंबई मध्ये रिक्षा,टॅक्सीचं भाडं नाकारणार्या चालकांची कुठे, कशी करू शकता तक्रार? जाणून घ्या इथे
पण आता अशा रिक्षा, टॅक्सी चालकांची तक्रार नेमकी कुठे करायची हा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर पहा त्यासाठीचा हेल्पलाईन नंबर काय आणि तक्रार कुठे करु शकाल?
मुंबई ट्राफिक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) काही दिवसांपूर्वीच कमी अंतरासाठी भाडं नाकारणार्या रिक्षा, चालकांविरूद्ध कडक कारवाई केली जाईल असे निर्देश दिले आहेत. मुंबईच्या अनेक भागात प्रवाशांची जवळच्या ठिकाणी रिक्षा, टॅक्सी मिळत नसल्याने गैरसोय होते. प्रामुख्याने घाईच्या वेळेत ही गैरसोय होत असल्याने अनेकांनी तक्रारी केल्या होत्या आता त्यांना प्रतिसाद मिळणार आहे.
रेल्वे स्टेशन, बस स्थानकाबाहेर अनेकदा कमी अंतराच्या भाड्यासाठी रिक्षा, टॅक्सी मिळत नाहीत. पण आता अशा रिक्षा, टॅक्सी चालकांची तक्रार नेमकी कुठे करायची हा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर पहा त्यासाठीचा हेल्पलाईन नंबर काय आणि तक्रार कुठे करु शकाल?
रिक्षा, टॅक्सी चालकाने भाडं नाकारलं अथवा त्यांच्याकडून कोणता त्रास झाला तर त्यांची तक्रार ते व्हॉट्सअॅप द्वारा करू शकतात. यामध्ये (+91) 8454999999 या क्रमाकांवरही कॉल करण्याची मुभा आहे. शक्य तितक्या लवकर तक्रारीची दखल घेतली जाईल याचा प्रयत्न वाहतूक विभागाकडून केला जाणार आहे.
ताडदेव आरटीओ (Tardeo RTO) च्या स्पेशल टीमची मदत घेऊन टॅक्सीचालकांविरूद्ध कारवाई सुरू आहे. त्यामध्ये स्पेशल टीमचे सदस्य मुंबई शहरात गर्दीच्या ठिकाणी सतत भेटी देत असतात. यामध्ये रेल्वे स्टेशन, मार्केट्सचा समावेश आहे.
दरम्यान तुम्हांला ताडदेव स्पेशल टीम कडून मदत हवी असल्यास सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेत 90762010101 क्रमांकावर मदत मागू शकता. संध्याकाळी 7 नंतर प्रवाशांना मदत करण्यासाठी या क्रमांकावरच व्हॉट्सअॅप, टेक्स्ट मेसेज केला जाऊ शकतो. तसेच तुमची तक्रार mh01taxicomplaint@gmail.com या इमेलद्वाराही करू शकता. नक्की वाचा: मुंबई मध्ये टॅक्सी चालकाने भाडं नाकरालं तर थेट फोन वर मदतीला येणार Tardeo RTO ची स्पेशल टीम .
रिक्षा,टॅक्सी चालकांना कशी होणार शिक्षा?
मुजोर रिक्षा, टॅक्सी चालकांविरूद्ध मो.वा.का. 178 (3),1988 अंतर्गत कारवाई होणार आहे. जर परमिट धारक किंवा कंत्राटी गाडीच्या चालकाने, या कायद्याच्या तरतुदीचे किंवा त्याखाली केलेल्या नियमाचे उल्लंघन करून, कंत्राटी गाडी चालवण्यास किंवा प्रवाशांना नेण्यास नकार दिला, तर ते (दंडास पात्र असतील. हा दंड 50 रूपये आणि त्यापासून अधिक असणार आहे. इतर कोणत्याही बाबतीत, 200 रुपयांपर्यंत वाढू शकेल अशा दंडास ते पात्र आहेत.