महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या त्यांच्या संघर्षाचा इतिहास

त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या संघर्षमय जीवनाचा इतिहास जाणून घेऊयात.

Yashwantrao Chavan (PC - File Photo)

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी झाला. सातारा जिल्‍ह्यातील 'देवराष्ट्र' हे त्यांचे जन्‍मस्‍थान. त्यांचे वडील लहान बालपणी वारले. त्यानंतर यशवंतराव यांची आई विठाबाई, त्यांचे बंधू ज्ञानदेव यांनी कष्ट करून यशवंतरावांना शिक्षण दिले. यशवंतरावांना लहानपणापासून भाषण, संगीत आणि भजन-कीर्तनाची आवड होती. त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली. त्यांनी सालसेत येथे सत्याग्रहात भाग घेतला. त्यानंतर त्यांना अठरा महिन्यांची शिक्षाही झाली. यशवंतराव येरवडा तुरुंगात असताना आचार्य भागवत, एस.एम. जोशी यांच्यासारख्या नेत्यांशी त्यांची ओळख झाली. तेथेच त्यांना राजकीय, सामाजिक प्रश्नांची जाणीव झाली. (हेही वाचा - Maharashtra Assembly Election 2019: कमळ, हाताचा पंजा आणि घड्याळ, जाणून घ्या विविध राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा इतिहास)

यशवंतरावांनी एल्.एल्. बी. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 1942 मध्ये स्वातंत्र्यलढ्यात भूमिगत होऊन कार्य केले. त्यानंतर त्यांनी 1947 मध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी देशाचे संरक्षण, गृह, परराष्ट्र आणि वित्तमंत्री पदाची जबाबदारी उत्तमरित्या स्विकारली. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली कार्य केले. यशवंतराव चव्हाण यांनी 25 नोव्हेंबर 1984 रोजी जगाचा निरोप घेतला.

यशवंतराव चव्हाणांची ग्रंथसंपदा

अरुण साधू, मधु मंगेश कर्णिक आणि मी पु.द. कोडोलीकर यांनी ‘यशवंतराव चव्हाण, जडणघडण’ या ग्रंथाचे संपादन केले आहे. विचारवंत गोविंद तळवलकर यांनी यशवंतरावांचा ‘सुसंस्कारित मराठी नेता’ या शब्दांत गौरव केला आहे. ना.सी. फडके यांनी त्यांच्या ‘कृष्णाकाठ’ या आत्मवृत्ताबद्दल प्रशंसा केली आहे. थोर गायक भीमसेन जोशी यांनी यशवंतरावांना शास्त्रीय संगीताची उत्तम जाण होती, असं सांगितलं होत. अशा सर्वगुण संपन्न नेत्याला मनापासून अभिवादन!