Happy Holi 2019: वरळी येथील बी.डी.डी चाळीत दहशतवाद्यांचा म्होरक्या मसूद अजहर आणि पबजीची होळी
होळी अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपली आहे. तर मुंबईतल्या कोळी वाड्यातील लोकांची होळी पाहण्याजोगी असते.
Happy Holi 2019: होळी अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपली आहे. तर मुंबईत वरळी येथील होळी पाहण्याजोगी असते. या दिवशी मोठ्या जल्लोषात लोक होळीचा आनंद साजरा करताना दिसून येतात. तर मुंबईतील वरळी येथील बी.डी.डी चाळ येथील होळी पाहण्यासाठी लोक खुप गर्दी करतात. तसेच प्रत्येक वेळी या चाळीकडून विविध प्रकारच्या पद्धतींची होळी उभारण्यात येते.
वरळी येथील बी.डी.डी चाळ क्र. 78/79 मधील वीर नेताजी क्रीडा मंडळ यांनी यंदाच्या होळीच्या निमित्ताने पुलवामा दहशतावदी हल्ल्यातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर (Masood Azhar) ह्याची होळी उभारली आहे. तसेच गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरणाऱ्या या मंडळाची यंदाची होळी 20 मार्च रोजी रात्री ठिक 12 वाजता जाळ्यात येणार आहे.(हेही वाचा-Holika Dahan 2019: हुताशनी पौर्णिमा दिवशी होळी का पेटवली जाते? यंदा होलिका दहन करण्याचा मुहूर्त काय?)
तसेच बी.डी.डी चाळ क्रमांक 76/77 यांनी पबजी (PUBG) गेमची होळी उभारली आहे. सध्या देशभरातून पबजी गेमवर बंदी आणण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच पबजी मुळे तरुणांचे जीव गेल्याच्या घटना ही समोर आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी पबजी गेमवर पूर्णपणे बंदी आणण्यात येईल का याबद्दल पालक प्रश्न उपस्थित करत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)