H3N2 इन्फ्लूएंझा रुग्ण वाढताच मुंबई महापालिकेकडून घरोघरी सर्वेक्षण
मुंबई (BMC) महापालिका हद्दीत जानेवारी ते 15 मार्च 2023 या काळात सुमारे 118 H3N2 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा आणि शहराचा या आधीचा कोरोना काळाचा अनुभव लक्षात घेता राज्य सरकारने सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे.
H3N2 इन्फ्लूएंझा (H3N2 influenza) रुग्णांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) जोरदार कामाला लागली आहे. मुंबई (BMC) महापालिका हद्दीत जानेवारी ते 15 मार्च 2023 या काळात सुमारे 118 H3N2 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा आणि शहराचा या आधीचा कोरोना काळाचा अनुभव लक्षात घेता राज्य सरकारने सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे. परिणामी महापालिका प्रशासन घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. खास करुन तापाचे रुग्ण आणि ज्यांना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका आहे. पण असे असूनही त्यांनी वैद्यकीय सेवेची मागणी केलेली नाही अशा लोकांची ओळख पटवण्यासाठी बीएमसी घरोघरी सर्वेक्षण करत आहे.
मुंबई (BMC) महापालिका हद्दीत जानेवारी ते 15 मार्च 2023 या काळात सुमारे 118 H3N2 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी जानेवारीमध्ये 19, फेब्रुवारीमध्ये 46 आणि मार्चमध्ये 53 प्रकरणे नोंदवली गेली. एकूण रुग्णांपैकी 32 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. एकूण रुग्णांपैकी चार रुग्ण हे H3N2 आणि 28 रुग्ण H1N1 विषाणूने संक्रमित आहेत. सर्वांवर उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
H3N2 आणि 2009 H1N1 म्हणजे काय?
H3N2 आणि 2009 H1N1 हे दोन्हीही इन्फ्लूएंझा विषाणूचे स्ट्रेन आहेत. ज्यांना 28 H1N1 देखील म्हटले जाते. दोन्ही विषाणूंमुळे मानवाला श्वसनाचे आजार होऊ शकतात. पण त्यांच्या पद्धती, जोखीम आणि होणारा त्रास व्यक्तीनुरुप वेगवेगळा असतो. H3N2 हा इन्फ्लूएंझा ए विषाणूचा एक उपप्रकार आहे . जो प्रामख्याने विशेषत: वृद्ध प्रौढ आणि लहान मुलांमध्ये आढळतो. H3N2 संसर्ग टाळण्यास मदत करणार्या लसी उपलब्ध आहेत. H1N1 हा इन्फ्लूएंझा ए हासुद्दा व्हायरसचा आणखी एक उपप्रकार आहे. H3N2 आणि 2009 H1N1 हे इन्फ्लूएंझा ए विषाणूचे वेगवेगळे प्रकार आहेत. दोन्हींमुळे मानवांमध्ये श्वसनाचे आजार होऊ शकतात.
दरम्यान, मुंबई महापालिकेने केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, इन्फ्लूएंझा हा एक विषाणूजन्य आजार आहे. जो हवेतून पसरतो. इन्फ्लूएंझाच्या लक्षणांमध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे, घशात जळजळ, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या यांचा समावेश होतो. ही लक्षणे सहसा उपचारानंतर कमी होतात आणि त्यांची तपासणी करण्याची आवश्यकता नाही. मात्र काही रुग्णांना अधिक त्रास होऊ शकतो. ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे.