Chinchpoklicha Chintamani: चिंचपोकळीचा चिंतामणी आगमन सोहळ्यात चोरांचा डल्ला, 76 भक्तांचे मोबाईल, सोन्याच्या साखळ्या लंपास

Chinchpoklicha Chintamani | (PC: Twitter )

मुंबईतील लालबागचा राजा (Lalbaugcha Raja ) नंतर चर्चेत असलेल्या गणपीतींपैकी एक असा चिंचपोकळीचा चिंतामणी (Chinchpoklicha Chintamani). चिंचपोकळीच्या या चिंतामणीचे भक्तांच्या उत्साहात जोरदार स्वागत झाले. मात्र या वेळी झालेल्या गर्दीत चोरांनी भलताच प्रसाद भक्तांना दिला. चिंताणीच्या आगमनावेळी झालेल्या गर्दीत चोरांनी चांगलाच डल्ला मारला असून त्याचा फटका जवळपास 76 जणांना बसल्याची माहिती पुढे आली आहे. या गर्दीत 76 भक्तांचे महागडे मोबाईल आणि गळ्यातील सोन्याची चेन आणि इतर दागिणे चोरट्यांनी लंपास केले आहेत.

चिंचपोकळीचा चिंतामणीचा आगमन सोहळा दुपारी दोन वाजलेपासून सुरु झाला. मंडपात निश्चित ठिकाणी आगमण होण्यासाठी रात्रीचे जवळपास 8 वाजले. या वेळी भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी डाव साधल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी बोलतान सांगितले की, आमगन सोहळ्यावेळी आणि विसर्जनाच्या दिवशी चोरीच्या अनेक घटना घडतात. आपल्या आवडत्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्त गर्दी करतात. या गर्दीचा फायदा उठविण्यासाठी संधीसाधू आणि चोरही गर्दीत सहभागी होतात. यंदाही आगमन मिरवणुकीसाठी भक्तांची विक्रमी गर्दी जमली. कोविड-19 निर्बंधांमुळे लोकांना गेल्या दोन वर्षांपासून उत्सवाचा आनंद घेता आला नाही. त्यामुळे भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Lalbaugcha Raja 2022 First Look Date, Time: गणेश भक्तांना आज घेता येणार लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती मूर्तीचे मुख दर्शन)

गणेशोत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या चोरीच्या घटना विचारात घेता पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून काही पाकिटमारांच्या टोळ्या जेरबंद केल्या आहेत. मीडडेने दिलेल्या वृत्ता म्हटले आहे की, मुंबई पोलिसांचे सर्व झोनचे पोलीस सक्रीय झाले आहेत. चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी ते बारीक नजर ठेऊन आहेत.