Rishikesh Jondhale: महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद ऋषीकेश जोंधळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यास भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. मात्र, या गोळीबारात भारताचे पाच जवान शहीद झाले. तर, तीन नागरिकांचा मृत्यू झाला.
पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या गुरेझ ते उरी क्षेत्रातील नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचा शुक्रवारी पुन्हा भंग केला होता. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यास भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. मात्र, या गोळीबारात भारताचे पाच जवान शहीद झाले. तर, तीन नागरिकांचा मृत्यू झाला. या शहीद जवानांमध्ये महाराष्ट्राच्या दोन सुपुत्र ऋषिकेश जोंधळे (Rishikesh Jondhale) आणि नागपूरचे भूषण रमेश सतई (Bhushan Ramesh Satai) यांना वीरमरण आले. ऋषीकेश यांचे पार्थिव आज त्यांच्या मूळगावी बहिरेवाडी येथे आणण्यात आले. तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. भाऊबीजेच्या दिवशीच ऋषिकेश यांच्या चितेला अग्नी देत असताना संपूर्ण महाराष्ट्र अश्रूंच्या शोकसागरात बुडाले आहे.
जम्मू काश्मीर मधील उरी सेक्टर आणि गुरेज सेक्टर दरम्यान शुक्रवारी अनेक ठिकाणी युद्धबंदी कराराचे पाकिस्तानने उल्लंघन केले. पाकिस्तानी हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानचे 8 सैनिक ठार झाले. तसेच पाकिस्तानी लष्कराचे तंबू, खंदक आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाल्याचे दर्शवणारी चित्रफित भारतीय लष्कराने प्रसारित केली होती. मात्र, पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यात भारताचे 5 जवान शहीद झाले तर, 3 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- PM Narendra Modi Diwali Celebration: पीएम नरेंद्र मोदी यांनी जैसलमेर, लोंगेवाला येथे सैनिकांसोबत साजरी केली दिवाळी; मिठाईचे केले वाटप (Watch Video)
ट्वीट-
ऋषीकेश यांना त्यांच्या कुटुंबीयांनी सैन्यात जाण्यास विरोध केला होता. मात्र, देशाची सेवा करण्याची मनात इच्छा असल्याने ऋषिकेश 2018 मध्ये लष्करात दाखल झाले होते. ऋषिकेश हे ‘मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत होते.