Devendra Fadnavis: चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्याबाबत फडणवीसांचं स्पष्टीकरण, म्हणाले...

आम्ही सर्व प्रक्रियेत एक होतो. हे सरकार अडीच वर्षे पूर्ण करेल पण पुढे देखील निवडणुकीत आम्ही चांगले जिंकुन येवू असे फडणवीस म्हणाले.'

Devendra Fadnavis (Photo Credit - Twitter)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुख्यमंत्री पदामुळे भाजपमध्ये (BJP) एक मोठा गट नाराज असल्याचे पुढे आले आहे. भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या भाषणातील वक्तव्यामुळे या नाराजीची अधिक चर्चा उघडपणे सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेऊन मुख्यमंत्री केल्याची भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. पनवेल येथे भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत केलेल्या भाषणात पाटील यांनी यांनी हे व्यक्तव्य केले. या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devednra Fadnavis) यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. समारोपाच्या वेळी त्यांनी म्हटलं की, 'एकनाथ शिंदे हे आपले नेते आहेत. आपल्या सर्वांचे नेते शिंदे आहेत. मगाशी चंद्रकांत दादा म्हणाले त्याचा चूकीचा अर्थ काढला जात आहे. आम्ही सर्व प्रक्रियेत एक होतो. हे सरकार अडीच वर्षे पूर्ण करेल पण पुढे देखील निवडणुकीत आम्ही चांगले जिंकुन येवू असे फडणवीस म्हणाले.'

दरम्यान, पाटील यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाल्याने हे भाषण आता सोशल मीडियावरुन हटवल्याचे समजते. पाटील यांनी केलेल्या व्यक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधान आले होते. आता चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी पूर्ण प्रकरण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. (हे देखील वाचा: Devendra Fadnavis: भाजप कार्यकारिणीत फडणवींसाकडून शिंदेंचं कौतुक, राज्यातील सत्तापरिवर्तन हे सत्तेसाठी नाही तर जनतेच्या विकासासाठी)

फडणवींसाकडून माविआवर निशाना

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पनवेलमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी माविआवर निशाना साधला, ते म्हणाले, गेली अडीच वर्ष संघर्षात गेली. राज्यात अडीच वर्ष अघोषित आणीबाणी होती. गेले अडीज वर्ष राज्यात विकास थांबला होता. सरकार कोण चालवतंय, ते रामभरोसे होतं. हे पाहून वाटायचं की हे कसलं सरकार आहे? पण राज्यात सत्तांतर झाल आणि आपल सरकार आलं. हे सरकार यावं, ही तर श्रींची इच्छा होती. हे परिवर्तन सत्तेसाठी नाही तर राज्यातील जनतेच्या सुटकेसाठी, त्यांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी हे परिवर्तन आहे. असे फडणवीस म्हणाले.