Election Commission Website Hang: निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ हँग; त्रुटी दूर करण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी केली शासनाला विनंती
त्यामुळे उमेदवार आता ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज भरू शकतात.
Election Commission Website Hang: सध्या राज्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणूका (Grampanchayat Election) होणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरणे सुरू आहे. मात्र, आता निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ (Election Commission Website) चालत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. अर्ज भरण्यासाठी 2 डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे. परिणामी निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ हँग होत आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या सर्व प्रकारानंतर राष्ट्रवादीच्या खासदास सुप्रिया सुळे यांनी करत शासनाला यावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून उमेदवारांची तक्रार शासनापर्यंत पोहोचवली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला असून यासाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. परंतु, यासाठी दिलेले संकेतस्थळ अतिशय संथगतीने सुरु आहे. वेबसाईट देखील बंद पडत आहे, अशा तक्रारी आहेत. संकेतस्थळाबाबत असलेल्या त्रुटी दूर करण्याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात. जेणेकरुन उमेदवारांना अर्ज भरणे सोपे होईल.' (हेही वाचा - Raj Thackeray On NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून राज्यात जातीपातीचे राजकारण वाढले- राज ठाकरे)
औरंगाबादमधील अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत आहेत. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बिडकीन गावात गेल्या दोन दिवसांपासून 50 पेक्षा अधिक उमेदवार आपला अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रात रात्र जागून काढत आहे. परंतु, तरीही उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी वारंवार अडचणी येत आहेत. (हेही वाचा - Helmet Mandatory in Nashik: नाशिक मध्ये आजपासून हेल्मेट सक्ती; पहा दंड कितीचा)
दरम्यान, राज्यात सध्या 7 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहे. यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याठी उद्यापर्यंत वेळ आहे. परंतु, अर्ज भरताना 'पंचायत महाराष्ट्र इलेक्शन महाराष्ट्र डॉट गव्हरमेंट डॉट इन' ही वेबसाईड हँग होत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ काही तास बाकी आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज कसा भरायचा? असा प्रश्न राज्यात सर्व इच्छूक उमेदवारांना पडला आहे.
तथापी, राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के सूर्यकृष्णमुर्ती यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज स्विकारले जातील, असे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे उमेदवार आता ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज भरू शकतात. दरम्यान, इच्छूक उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची मुदत 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर देण्यात आली आहे. तसेच 5 डिसेंबरपर्यंत अर्जाची छाननी करण्यात येणार असून 7 डिसेंबरपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतात. तसेच येत्या 18 डिसेंबरला ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान होणार असून 20 डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल लागणार आहे.