El Nino and Maharashtra Drought: महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? एल निनोचा फटका बसण्याची शक्यता; अमेरिकी हवामान संस्थेचा अंदाज
एनओएए (NOAA ) ने म्हटले आहे की, साधारण जून ते डिसेंबर 2023 या काळात एल निनो हे 55 ते 60% प्रभाव दाखवू शकते. ज्यामुळे सुरुवातीला अवकाळी पाऊस आणि नंतर दुष्काळाचे सावट पाहायला मिळू शकते. एल निनोचा थेट प्रभाव मान्सूनवर होण्याची शक्यता असल्याने या नैसर्गिक घडामोडी घडू शकतात असे एनओएएचे म्हणने आहे.
Maharashtra Drought: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामिण तसेच शहरी भागातील जनतेसाठी काहीशी चिंतेत टाकणारी बातमी आहे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. ल निनोमुळे (El Nino) महाराष्ट्रात दुष्काळ पडू शकतो, असे भाकीत अमेरिकेच्या हवामान अभ्यासक संस्था नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशननं ( National Oceanic and Atmospheric Administration) संस्थेने केले आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा लांबू शकतो. तसेच, सोबत दुष्काळही घेऊन येऊ शकतो, असे या संस्थेने म्हटले आहे. El Nino मान्सूनवर परिणामकारक ठरु शकते. जेणेकरुन सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते.
काय आहे NOAA?
नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) ही युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ कॉमर्समधील एक वैज्ञानिक संस्था आहे. जी 1970 मध्ये पृथ्वीवरील महासागर, वातावरण आणि किनारी प्रदेशांचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आली. पृथ्वीच्या वातावरणातील बदल समजून घेणे आणि अंदाज करणे हे NOAA चे ध्येय आहे. यात हवामानाचे स्वरूप, हवामानातील परिवर्तनशीलता आणि सागरी आणि वातावरणीय परिस्थिती यांचा समावेश आहे. NOAA संशोधन करते, डेटा संकलित करते आणि लोकांना माहिती देण्यासाठी आणि धोरणकर्ते, व्यवसाय आणि व्यक्तींद्वारे निर्णय घेण्यास समर्थन देण्यासाठी सेवा प्रदान करते. ज्याचा जगभरातील देशांनाही फायदा होतो.
एनओएए (NOAA ) ने म्हटले आहे की, साधारण जून ते डिसेंबर 2023 या काळात एल निनो हे 55 ते 60% प्रभाव दाखवू शकते. ज्यामुळे सुरुवातीला अवकाळी पाऊस आणि नंतर दुष्काळाचे सावट पाहायला मिळू शकते. एल निनोचा थेट प्रभाव मान्सूनवर होण्याची शक्यता असल्याने या नैसर्गिक घडामोडी घडू शकतात असे एनओएएचे म्हणने आहे. एल निनो ही एक हवामानातील घटना आहे जी उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागरात उद्भवते. त्याचा परिणाम होतो आणि मध्य आणि पूर्व पॅसिफिकमधील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ होते. ही तापमानवाढ सामान्यत: उन्हाळ्याच्या शेवटी किंवा शरद ऋतूच्या सुरुवातीस सुरू होते आणि अनेक महिने ते काही वर्षे टिकते. याच्या उलट घटना घडली तर तिला निना असे म्हटले जाते. ज्यामध्ये पूर्व पॅसिफिकमध्ये समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा थंड असते.
दरम्यान, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख सुनिल कांबळे यांनी प्रसारमाध्यमांशी माहिती देताना सांगितले की, भारतीय हवामान विभागाने अल निनो संदर्भात काही माहिती दिली तर त्याबाबत लगेच जनतेला कवळवले जाईल. सध्या तरी अमेरिकेच्या संस्थेने अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाचा अंदाज येईपर्यंत काही काळ वाट पाहायला ही अशी, सावध प्रतिक्रियाही प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)