IPL Auction 2025 Live

Double Mutant in Maharashtra: महाराष्ट्रातील 361 कोरोना विषाणू नमुन्यांपैकी 61% मध्ये आढळला 'डबल म्यूटंट'; जानेवारी ते मार्च दरम्यान गोळा केले होते नमुने

एका जीनोम सिक्वेंसींग तज्ञाने दावा केला आहे की, यावर्षी महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) जानेवारी ते मार्च दरम्यान कोविड-19 (Coronavirus) साठी गोळा केलेल्या एकूण 361 नमुन्यांपैकी, 61 टक्क्यांमध्ये दुहेरी उत्परिवर्तन म्हणजेच डबल म्यूटंट (Double Mutant) आढळून आला आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

एका जीनोम सिक्वेंसींग तज्ञाने दावा केला आहे की, यावर्षी महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) जानेवारी ते मार्च दरम्यान कोविड-19 (Coronavirus) साठी गोळा केलेल्या एकूण 361 नमुन्यांपैकी, 61 टक्क्यांमध्ये दुहेरी उत्परिवर्तन म्हणजेच डबल म्यूटंट (Double Mutant) आढळून आला आहे. कोरोना साथीच्या आजाराने सर्वाधिक त्रस्त असलेल्या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच्या नमुना संकलन करण्याच्या पद्धतींवरही त्यांनी शंका व्यक्त केली. हे नमुने नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV), पुणे या ठिकाणी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तीन महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रातून घेण्यात आलेल्या 361 नमुन्यांपैकी 220 नमुन्यांमध्ये E484Q आणि L452R असे म्युटेशन आढळले आहेत.

24 मार्च रोजी केंद्र सरकारने, महाराष्ट्रातील 15-20 टक्के नमुन्यांमध्ये डबल म्युटेशन आढळल्याचे सांगितले होते. परंतु या व्हेरिएंटला त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी जोडले नव्हते. आता 10 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सरकारी प्रयोगशाळेच्या प्रमुखांशी सादरीकरणाच्या वेळी एनआयव्हीने डबल म्युटेशनची ही आकडेवारी शेअर केली. आकडेवारीची दखल घेतल्यानंतर, राज्य सरकारने केंद्राला महाराष्ट्रातील सर्व नमुन्यांच्या जीनोम म्युटेशनबाबत सविस्तर अहवाल मागितला आहे.

मात्र, हे 361 नमुने तशी खूप कमी संख्या आहे, कारण महाराष्ट्रात दररोज सुमारे दोन लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावरून राज्यात डबल म्युटेशन वाढत असल्याचे नमूद केले जाऊ शकत नाही, असे एक अधिकाऱ्याने सांगितले. केंद्रानेही या डबल म्युटेशनमुळे राज्याने वेगळे धोरण न अवलंबता आहे त्याच मॉडेलप्रमाणे काम करावे असे सांगितले आहे. (हेही वाचा: Maharashtra Curfew Guidelines: राज्यात 1 मे पर्यंत लागू असलेल्या संचारबंदी मध्ये पहा नेमकं काय सुरू, काय बंद असेल?)

एनआयव्ही आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, जानेवारीत, डबल म्युटंट व्हेरिएंट B.1.617 प्रथम अकोल्यातील तीन आणि ठाण्यातील एका नमुन्यामध्ये आढळला होता. फेब्रुवारी महिन्यात अकोला, अमरावती, भंडारा, हिंगोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, पुणे, वर्धा आणि यवतमाळ या 13 जिल्ह्यांमधील 50 टक्के पेक्षा जास्त नमुन्यांमध्ये हा अत्यंत संक्रामक प्रकार आढळला.