Kandivali: PT तासिकेत खेळत असताना जमिनीवर कोसळला, कांदिवली येथील खासगी शाळेत अल्पवयीन मुलाचा मृत्यू

मुंबईतील कांदिवली पूर्व येथे निर्मला इंग्लिश स्कूलमध्ये ८ वर्षाच्या मुलाचा खेळत असताना मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी सांगितले की, प्राथमिक तपासात कोणताही गैरप्रकार आढळून आला नाही.

Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Kandivali: मुंबईतील कांदिवली पूर्व येथे निर्मला इंग्लिश स्कूलमध्ये ८ वर्षाच्या मुलाचा खेळत असताना मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी सांगितले की, प्राथमिक तपासात कोणताही गैरप्रकार आढळून आला नाही. मुलाच्या मृत्यूनंतर शाळेत एकच खळबळ उडाली आहे.  (हेही वाचा- धक्कादायक! एकाच कुटुंबातील तिघांचा राहत्या घरात आढळला मृतदेह, पालघर येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला इंग्लिश स्कूलमध्ये लंच ब्रेकमध्ये खेळत असताना एक अल्पवयीन मुलगा अचानक बेशुध्द अवस्थेत जमिनीवर पडला. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. शाळेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना शाळेजवळील श्री जी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांना त्यांना शताब्दी रुग्णालयातमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला शताब्दी रुग्णालयात मृत घोषित केले. शिवांश असं मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. तो तिसरीचा विद्यार्थी होता. समता नगर पोलिसांनी शुक्रवारी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवांश शुक्रवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. दुपारी ३ वाजता  PT च्या तासिकादरम्यान सर्व मुले मैदानात खेळत होते. शिवांश देखील खेत होता. त्यावेळीस अचानाक खेळत असताना बेशुध्द पडला. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे मृत घोषित केले. या घटनेची माहिती तात्काळ  शिवांशच्या पालकांना देण्यात आली. शिवांशला कोणताही आजार नव्हता अशी माहिती पालकांनी दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement