COVID19: पुणे येथे मास्क न घालण्यासह रस्त्यांवर थुंकणाऱ्यांच्या विरोधात धडक कारवाई, 18 कोटींचा दंड वसूल
तर नागरिकांना वारंवार कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन सुरुवाती पासूनच केले जात आहे. मात्र तरीही काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे.
COVID19: कोरोना व्हायरसचे थैमान अद्याप कायम असून त्याचे नवे रुप स्ट्रेनमुळे भीती व्यक्त केली जात आहे. तर नागरिकांना वारंवार कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन सुरुवाती पासूनच केले जात आहे. मात्र तरीही काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. याच कारणास्तव आता पुण्यात मास्क न घालणाऱ्या आणि रस्त्यांवर थुंकणाऱ्यांच्या विरोधात धडक कारवाई केली गेली आहे. या कारवाईत पुण्यातून तब्बल 18 कोटी रुपयांचा दंड वसूली करण्यात आली आहे.(Schools Reopen in Nashik, Pune, Aurangabad From Today: नाशिक, पुणे, औरंगाबाद आदी जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळा सुरु)
पुण्यात कोरोना संबंधित सुचना देऊ न ही नागरिकांकडून त्या पाळल्या जात नसल्याचे दिसून आले. तसेच त्यांना एकदा सांगून सुद्धा पुन्हा तिच चूक करत असल्याने आता जवळजवळ 2 लाख 71 हजार नागरिकांवर कारवाई केली गेली आहे. यामध्ये एकूण 18 कोटी 64 लाखांच्यां दंडाची वसूली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक नागरिक हे पुण्यातील ग्रामीण भागातील आणि त्यानंतर पुणे शहरातील असल्याचे समोर आले आहे.(COVID-19 Vaccine Dry Run: राज्यासह देशभरात आजपासून कोविड-19 लसीची ड्राय रन)
तर सोमवारीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ब्रिटेन येथून आलेल्या 8 जणांना कोविड19 च्या नव्या स्ट्रेनची लागण झाल्याची माहिती दिली होती. या 8 जणांमधील 5 जण हे मुंबई आणि प्रत्येकी एक जण हा पुणे, ठाणे आणि मिरा भायंदर येथील असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या व्यक्तिंच्या संपर्कात आलेल्यांचा शोध ही घेतला जात असल्याचे टोपे यांनी म्हटले होते. अशातच आता नियमांचे उल्लंघन करणे हे नागरिकांनाच कळले पाहिजे.