कोरोना व्हायरसमुळे इराण येथे महाराष्ट्रातील 600 भाविक अडकले, मायदेशी परत आणण्याची सरकारकडे मागणी
तर दोन दिवसांपूर्वीच जपनाच्या तटावर कोरोना व्हायरसमुळे डायमंड प्रिन्स जहाजावर अडकले होते. तर 116 भारतीयांना सरकारकडून पाठवण्यात आलेल्या एअर इंडियाच्या विमानाने सुखरुप मायदेशात परत आणण्यात आले आहे.
चीन मधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसचे जाळे आता जगभरात पसरले आहे. तर दोन दिवसांपूर्वीच जपनाच्या तटावर कोरोना व्हायरसमुळे डायमंड प्रिन्स जहाजावर अडकले होते. तर 116 भारतीयांना सरकारकडून पाठवण्यात आलेल्या एअर इंडियाच्या विमानाने सुखरुप मायदेशात परत आणण्यात आले आहे. मात्र आता इराणची राजधानी तेहेरानमध्ये भारतातील 600 भाविक अडकले आहेत. देभरातून 2 हजार भाविक येथे अडकले आहेत. कोरोना व्हायरसमुळे देशाने सीमाबंदी केल्याने त्यांना देशाबाहेर जाणे मुश्किल झाले आहे. या भाविकांकडून मायदेशी घेऊन जावे अशी मागणी केली जात आहे.
कोल्हापूर मधील साद टूर्स कंपनीने इराण येथे एक ट्रीपचे आयोजन केले होते. तर 31 जानेवारीला हे सर्व भाविक तेहेरानात पोहचले होते. तेहेरानमधील कुम शहरात भारतातील नागरिक अडकले आहेत. हे सर्व भाविक शिंपा पंथियांसाठी पवित्र असलेल्या आणि अन्य धर्मस्थळांच्या दर्शनासाठी गेले होते. मात्र कोरोना व्हारसचे संक्रामण इराणमध्ये झाल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी सीमा बंद केल्या. त्यामुळे आता सरकारकडून भाविकांना मायदेशी आणण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.(Coronavirus: जगभरातील 44 देशांतील 82,000 नागरिक कोरोना व्हायरस बाधित, सुमारे 2,800 जणांचा मृत्यू)
जगभरातील तब्बल 44 देशांमध्ये कोरोना व्हायरस धोका पोहोचला आहे. जगभरात 82,000 नागरिक कोरोना व्हायरस बाधित झाल्याचे समजते. गल्फन्यूजने याबाबत वृत्त दिले आहे. कोरोना व्हायरसमुळे जपानमधील डॉक्टरही हैराण झाले आहेत. दुसऱ्या बाजूला सौदी अरबमध्ये हजसाठी मक्का येथे जाणाऱ्या यात्रेकरुंनाही रोखण्यात आले आहे. या यात्रेकरुंमध्येही कोरोना व्हायरस लागण होण्याची भीती आहे.