Coronavirus: 'महाराष्ट्र तुमची काळजी घेत आहे, तुम्ही आम्हाला साथ द्या'; CM Uddhav Thackeray यांचे परप्रातीयांना आवाहन, जाणून घ्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
मुंबईत आज 11 लोकांचा मृत्यू झाला आहे
देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या वाढतच आहे, त्यात महाराष्ट्र (Maharshtra) आणि मुंबई (Mumbai) मधील रुग्ण हे तर चिंतेचे विषय बनत चालले आहेत. मुंबईत आज 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण 204 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 1 हजार 753 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज जनतेशी संवाद साधला व कोरोना व्हायरसबाबतच्या राज्यातील एकूण परिस्थितीबाबत माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणाची सुरुवात भीम सैनिकांचे आभार मानून केली. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, मात्र सर्व भीमसैनिकांनी अत्यंत शिस्तीत, गर्दी न करता या महापुरुषाला मानवंदना दिली त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे कौतुक केले.
तनिष्क मोरे, या सहा महिन्याच्या बाळाने कोरोना विषाणूवर मात केली आहे. तसेच एका 83 वर्षांच्या आजीबाईंनीही करोनाचे संकट उलटवून टाकले आहे, अशी उदाहरणे देत ठाकरे साहेबांनी महाराष्ट्र या संकटाशी कसा लढतो आहे हे मुद्द्येवार समजून सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -
> जगात एकाच ठिकाणी जितक्या चाचण्या झाल्या नसतील तेवढ्या चाचण्या महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये झाल्या आहेत.
> महाराष्ट्र सरकार या संकट काळात खंबीरपणे पाठीशी उभे आहे. डॉक्टर व्यवसाय क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सची टीम तयार केली आहे. हे डॉक्टर राज्यातील आरोग्य सेवेला गाईड करतील. यामध्ये कोणत्या रुग्णावर कशी ट्रिटमेंट करावी, काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले जाईल.
> आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी, मा. अजित पवार यांच्या अंतर्गत मंत्र्यांची एक टीम तयार केली आहे. ही टीम महाराष्ट्रातील उद्योगधंदे, व्यवसाय सुरु करण्याबाबत निर्णय घेईल.
> डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या अर्थतज्ञ यांचीही एक टीम तयार केली आहे. हे लोक आपल्याला आर्थिक संकटामधून बाहेर पाडण्यासाठी मदत करतील.
> 20 एप्रिल पर्यंत परिस्थितीचा आढावा घेऊन कोणते व्यवसाय सुरु करता येईल याचा निर्णय घेतला जाईल.
> मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा शेतीविषय कामे, जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा चालू राहतील याची आठवण करून दिली. (हेही वाचा: Bandra News: लॉक डाऊनचा उडाला फज्जा: संचारबंदी असताना मुंबईच्या बांद्रा परिसरात गावी जाण्यासाठी हजारो लोकांची गर्दी (Video))
> सध्या पुणे आणि मुंबई या दोन शहरांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. प्लाझ्मा ट्रिटमेंटच्या प्रयोगाची परवानगी राज्य सरकारने केंद्राकडे मागितली आहे.
> पावसाळ्याआधी दुर्गम भागातील आदिवासी लोकांना सोयीसुविधेचा पुरवठा करण्यासही सुरुवात करण्यात आली आहे.
> कोविड योद्धा या साईटवर लोकांना मदतीचे आवाहन केल्यानंतर, आज सकाळपर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील 21 हजार लोकांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. सव्वा कोटी कुटुंबीयांनी रेशन दुकानामधून धान्य नेले आहेत.
> देशातील तमाम राजकारणी राजकारण विसरून एकमेकांच्या हातात हात घालून या संकट काळात उभे आहेत. त्यामुळे राज्यात कोणी राजकारण करू नका.
> शिवभोजन थाळीची रोजची 80 हजार ताटे वाढवण्यात आली आहेत..
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज आपल्या भाषणात बांद्रा येथे घडलेल्या घटनेबाबतही भाष्य केले. बाहेरच्या राज्यातील लोकांनी इथे राहावे, महाराष्ट्र तुमची काळजी घेत आहे, तुमची मदत करत आहे. हे संकट सर्वांवरती आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला साथ द्या. असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.