Coronavirus: पुण्यात स्वॅब टेस्टिंगची क्षमता वाढवण्यास राज्य सरकारने मान्यता द्यावी; विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित कोरोनाचे रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) शहरात आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहले आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) संख्येत वाढ होऊ लागली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित कोरोनाचे रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) शहरात आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहले आहे. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता चाचण्या वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकारने नवीन प्रयोगशाळांना मान्यता द्यावी, अशी विनंती विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. कोरोना विषाणूसंबंधी स्वॅब टेस्टिंगची क्षमता वाढवण्याबाबत पुणे महापालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्याच्या मान्यतेसाठी त्यांनी विनंती केली आहे. तरीही याबाबत लवकर निर्देश द्यावे, असेही फडणवीस म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही याबाबत उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर बोलणे झाले आहे, अशी माहिती समोर आली आहे. देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी संपूर्ण देशात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील मुंबईनंतर पुण्यातही कोरोनाचे जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. पुणे महापालिकेकडून सध्या स्वॅब कलेक्शन मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहे. त्यावर पुढील प्रक्रिया होण्यास बराच कालावधी लागत असल्याने संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची हीच ती वेळ, उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी, काँग्रेसपासून दूर रहावे अन्यथा त्यांचे राजकारण संपेल- सुब्रमण्यम स्वामी
“स्वॅब नमुने तपासणी प्रलंबित असल्याने सॅम्पलचा अहवाल तीन दिवसांनी मिळतो. त्यामुळे क्वारंटाईन सेंटरमधून संसर्गाचा धोका वाढण्याची भीती आहे. रिझल्ट अव्हेटेड असलेल्यांची संख्या वाढलेली आहे. यापैकी कोरोनाबाधित नागरिकांमुळे संक्रमण झपाट्याने वाढण्याची भीती आहे. सॅम्पल प्रलंबित राहिल्याने दुसरीकडेनवे सॅम्पल घेण्याची प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह असणारे नागरिक समाजात वावरण्याची शक्यता आहे”, अशी भीती महापौरांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
Coronavirus Outbreak: भारतात कोरोना रुग्णांचा आकडा १ लाखांपेक्षा अधिक; २४ तासात ५,६११ रुग्णांची वाढ - Watch Video
दरम्यान पुण्यात सध्या 4 हजार 58 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर त्यापैकी 938 बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत 207 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबई पाठोपाठ पुण्याला देखील कोरोनाने कवेत घेतलं आहे. अजून काही संसर्ग वाढू नये म्हणून पुण्यात लवकरत लवकर स्वॅब टेस्टिंगची क्षमता वाढवावी अशी मागणी फडणवीस आणि महापौर मोहळ यांनी केली आहे.