पुण्यातील ससून रुग्णालयाच्या नव्या इमारतीत मेडिकल गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम केवळ 11 दिवसांत पूर्ण; अशोक चव्हाण यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन
पुण्यातील ससून रुग्णालयाच्या नव्या इमारतीत ऑक्सिजन मेडिकल गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम केवळ 11 दिवसांत पूर्ण करण्यात आलं आहे. या विक्रमी कामाबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं अभिनंदन केलं आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या रुग्णांच्या उपचारासाठी राज्यातील रुग्णालय सज्ज असणं गरजेचं आहे. याचं पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयात केवळ 11 दिवसांत गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम करण्यात आलं आहे. यासंदर्भात टीव्ही9 या मराठी वृत्तवाहिनीने वृत्त प्रकाशित केलं आहे.
पुण्यातील (Pune) ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospital) नव्या इमारतीत मेडिकल गॅस पाईपलाईन (Medical Gas Pipeline) टाकण्याचं काम केवळ 11 दिवसांत पूर्ण करण्यात आलं आहे. या विक्रमी कामाबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं (Public Works Department) अभिनंदन केलं आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या रुग्णांच्या उपचारासाठी राज्यातील रुग्णालय सज्ज असणं गरजेचं आहे. याचं पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयात केवळ 11 दिवसांत गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम करण्यात आलं आहे. यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.
साधारणत: हे काम करण्यास सार्वजनिक विभागाला 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागला असता. मात्र, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी सार्वजनिक विभागाने रात्रंदिवस एक करून गॅस पाईपलाईन बसवण्याचं काम पूर्ण केलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: महाराष्ट्रात आज दिवसभरात 221 कोरोना बाधित रुग्णांची वाढ तर 22 जणांचा मृत्यू; राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1982 वर पोहोचली)
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ससून रुग्णालयाची 11 मजली इमारत बांधून पूर्ण झाली होती. मात्र, कोरोनाचे संकट आल्याने या इमारतीत अतिदक्षता व विलगीकरण कक्ष तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात मेडिकल गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम बाकी होतं. त्यामुळे राज्यापुढील आव्हान लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हे काम सोपवण्यात आलं, असंही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने 5 ते 6 महिने काळावधी लागणारे काम केवळ 11 दिवसांत पूर्ण केलं आहे. सार्वजनिक विभागाच्या या कामावर अॅटलास कॉप्को या बहुराष्ट्रीय कंपनीने प्रतिक्रिया दिली आहे. द्रवरूपी ऑक्सिजन वायूत रुपांतर करुन पुरवठा करण्याचं काम इतक्या कमी वेळेत पूर्ण करण्याचा हा जागतिक विक्रम असल्याचं अॅटलास कॉप्को कंपनीने म्हटलं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)