Nashik Tuition Teacher Molested Minor Girl: नाशिकमध्ये 32 वर्षीय ट्यूशन शिक्षकाकडून पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल
दहिभाते यांनी गुरुवारी वर्गात इतर विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत पीडित मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Nashik Tuition Teacher Molested Minor Girl: बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारा (Sexual Assault) च्या घटनेचे राज्यभरात पडसाद उमठत आहेत. अशातचं आता नाशिक (Nashik) च्या उपेंद्र नगरमध्ये एका 32 वर्षीय ट्यूशन शिक्षकाने (Tuition Teacher) पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग (Molestation) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कृष्णा दहिभाते असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, कृष्णा दहिभाते हे आपल्या पत्नीसह परिसरात खाजगी शिकवणी वर्ग चालवतात. दहिभाते यांनी गुरुवारी वर्गात इतर विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत पीडित मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याने मुलीला फळ्यावर कविता लिहिण्यास सांगितले आणि नंतर तिचा विनयभंग केला. तसेच मुलीला ही घटना तिच्या पालकांना न सांगू नये, अन्यथा तिच्यावर गैरवर्तन केल्याचा खोटा आरोप करेल, अशी धमकी दिली. (हेही वाचा - Badlapur Sexual Assault Case: 'राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ, वर्दिचा धाक राहिला नाही', निषेध आंदोलनात सुप्रिया सुळे यांची सरकारवर आगपाखड)
दरम्यान, मुलगी अस्वस्थ होऊन घरी परतली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या पालकांनी मुलीला घडलेल्या सर्व प्रकाराची विचारपूस केली. मुलीसोबत घडलेल्या घटनेमुळे संतापलेले पालकांनी कृष्णा दहिभातेच्या पत्नीची भेट घेतली. येथे त्यांना समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने हताश झालेल्या पालकांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली. (हेही वाचा - (Badlapur Adarsh School Sexual Assault Case: आदर्श विद्यालय बदलापूर मध्ये मुलींसोबत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी SIT स्थापन, शाळेविरूद्ध कारवाईचे CM Eknath Shinde यांचे आदेश)
विनयभंगाच्या या गंभीर आरोपाचा तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार करत आहेत. सध्या राज्यभरात बदलापूर प्रकरणावरून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणावरून विरोधक सरकारवर टिका करत आहेत. याशिवाय, कोलकाता येथील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात पडताना दिसत आहे.