बीड: छेडछाडीला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
बीड (Beed) येथे सततच्या छेडछाडीला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
बीड (Beed) येथे सततच्या छेडछाडीला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन तरुणांवर विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेटवर्क18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, वैष्णवी लव्हारे असे विद्यार्थिनीचे नाव आहे. तर वैष्णवी हिने यंदा दहावीची परिक्षा दिली होती. गावातील दोन तरुणांनी तिच्यासोबत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचसोबत पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांना मानसिक त्रास सुद्धा या दोन तरुणांनी देण्यास सुरुवात केला. परंतु सोमवारी रात्री वैष्णवी हिने गळफास लावून राहत्या घरात आत्महत्या केली.(पुणे: दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून रिक्षाचालकाने प्रवाशाला मारहाण करत लुटले)
तर आरोपी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्यांना या प्रकारानंतर अटक केली आहे.