मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करणार

आज त्यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. तसेच दुसरी यादी येत्या 28 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे. सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावांतील शेतकऱ्यांची यादी जाहीर करणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तीन महिन्यात टप्प्याटप्याने कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. सोमवारपासून राज्याच्या विधिमंडळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी यासंदर्भात माहिती दिली.

CM Uddhav Thackeray | (Photo Credit: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session) पहिल्या दिवशी म्हणजेचं उद्या शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी (Loan Waiver First List) जाहीर करणार आहेत. आज त्यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. तसेच दुसरी यादी येत्या 28 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे. सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावांतील शेतकऱ्यांची यादी जाहीर करणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तीन महिन्यात टप्प्याटप्याने कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. सोमवारपासून राज्याच्या विधिमंडळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी यासंदर्भात माहिती दिली.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधला. सरकारवर टीका करणे म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणे, असं नाही. विरोधी पक्षाने सरकारच्या काही चांगल्या योजनांचं कौतुकही करायला पाहिजे. विरोधकांकडून सरकारवर वारंवार आरोप होत आहेत. त्यांची ही भूमिका चुकीची आहे, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.  (हेही वाचा - मनसे चा वर्धापन सोहळा यंदा नवी मुंबईत, झेंडा आणि अजेंडा बदलल्यानंतर राज ठाकरे यांचा नवा फंडा)

महाविकास आघाडी सरकार 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहे. यासाठी उद्या शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात येईल. 35 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच गिरणी कामगारांच्या घरासाठी 1 मार्च रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे, असंही ठाकरे यांनी सांगितलं.