Rajyasabha Election 2022: 'महाराष्ट्रातील राज्यसभेच्या तीनही जागा भाजप जिंकेल', केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा दावा

पीयूष गोयल आणि अनिल सुखदेवराव यांच्याशिवाय भाजपने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे शिवसेनाही मागे नसून सहाव्या जागेवर उमेदवार देऊन भाजपसोबत लढण्याचे मनसुबे तयार केले आहेत.

Photo Credit - Twitter

महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajysabha Election 2022) उमेदवारी दाखल केल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी आज म्हणजेच 30 मे रोजी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी महाराष्ट्रात 5 वर्षे एवढे चांगले सरकार चालवले की आजही महाराष्ट्रातील जनता त्यांची आठवण करून देत असून शिवसेनेने केलेल्या फसवणुकीला पुन्हा एकदा उत्तर देण्याची संधी या राज्यसभा निवडणुकीत येणार असल्याचे ते म्हणाले. मागच्या वेळीही आमचे तिघेही खासदार झाले होते, यावेळीही तिघेही जिंकून येतील. वास्तविक महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांवर निवडणुका होणार आहेत. भाजपने महाराष्ट्रात तीन उमेदवार उभे करून निवडणूक रंजक बनवली आहे. पीयूष गोयल आणि अनिल सुखदेवराव यांच्याशिवाय भाजपने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे शिवसेनाही मागे नसून सहाव्या जागेवर उमेदवार देऊन भाजपसोबत लढण्याचे मनसुबे तयार केले आहेत.

Tweet

महाराष्ट्रात 6 जागा रिक्त आहेत. भाजपचे पीयूष गोयल, विकास महात्मे आणि विनय सहस्रबुद्धे, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम यांचा कार्यकाळ संपला आहे. शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार हे दोन उमेदवार उभे केले आहेत. पवार हे कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे काँग्रेसने इम्रान प्रतापगढी यांना तिकीट दिले आहे. भाजपने पियुष गोयल आणि अनिल सुखदेवराव यांना उमेदवारी दिली आहे. (हे देखील वाचा: राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट सापडल्याने ठाकरे सरकारची चिंता वाढली; आरोग्य मंत्र्यांनी नागरिकांना दिला मास्क वापरण्याचा सल्ला)

समजून घ्या महाराष्ट्राचे गणित

महाराष्ट्रात उमेदवाराला राज्यसभेवर विजयासाठी सुमारे 42 मतांची आवश्यकता असते. सध्याचे समीकरण पाहता भाजपला 2 जागा सहज मिळू शकतात. याशिवाय काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक जागा जिंकू शकतात. म्हणजेच उमेदवारांना 5 जागा सहज जिंकता येतील. सहाव्या जागेवरील लढत आणखी तीव्र होऊ शकते. वास्तविक या जागेवर भाजप आणि शिवसेनेने उमेदवार उभे केले आहेत.