सुट्टी न मिळाल्याचा राग अनावर; 23 वर्षीय मुलीने सुपरमार्केट कर्मचारीने लावली दुकानाला आग
सुपर मार्केट च्या या आगीत सुमारे 20 हजार रूपयांचा माल जळून खाक झाल्याची तक्रार भाईंदर पोलीस ठाण्यात सुपर मार्केट च्या व्यवस्थापकांनी केली आहे.
कामाच्या ठिकाणी सुट्टी न मिळाल्याच्या रागामध्ये एका 23 वर्षीय मुलीने सुपरमार्केट मध्ये आग लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना भायंदर मधील आहे. अद्याप या प्रकरणामध्ये कोणतीही अटक झालेली नाही. गुरूवारी (13 जुलै) सुपर मार्केट मध्ये खेळण्यांच्या आणि कपड्यांच्या सेक्शन मध्ये ही आग लावण्यात आली होती. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही तपासण्यात आला आहे. यामध्ये आग महिला कर्मचारीकडून लावण्यात आल्याचं दिसत आहे.
जेव्हा या प्रकरणी तपास करण्यात आला तेव्हा समोर आले की या महिलेने सुट्टी साठी अर्ज केला होता. तो नाकारण्यात आला. गुरूवारी (13 जुलै) तिने पुन्हा अर्ज केला. मात्र तो ही फेटाळण्यात आला.त्या रागात या महिलेने दुपारी आग लावली. नंतर अन्य कर्मचार्यांनी ती आग fire extinguishers ने विझवण्यात आली. ही महिला कामाच्या ठिकाणी नाखूष होती. तिला कामाच्या वेळेतही बदल हवा होता. दरम्यान पोलिसांनी महिलेला आगीशी खेळ केल्याच्या कारणास्तव संबंधित महिलेले ताब्यात घेतले होते. Fact Check: सरकारी कर्मचाऱ्यांना Encashment ऐवजी वर्षाला 20 Earned Leave घेणे बंधनकारक? जाणून घ्या व्हायरल बातमी मागील सत्य .
सुपर मार्केट च्या या आगीत सुमारे 20 हजार रूपयांचा माल जळून खाक झाल्याची तक्रार भाईंदर पोलीस ठाण्यात सुपर मार्केट च्या व्यवस्थापकांनी केली आहे.