भांडुप: मास्क न घातल्याच्या कारणास्तव विचारले असता महिलांनी क्लिनअप मार्शलच्या डोक्यात घातला पेवर ब्लॉक

प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर भांडुप रेल्वे स्थानकात एका मार्शल क्लिनअप महिलेने तेथीलच एका महिलेला मास्क न घातल्याच्या कारणास्तव विचारले. यावरुन त्यांच्यामधील वाद टोकाला जात तिने मार्शल क्लिनपअ महिलेच्या डोक्यातच पेवर ब्लॉक घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(Beed Couple Suicide: पत्नी प्यायली विष, त्यानंतर पतीनेही घेतला गळफास; बीड येथील धक्कादायक घटना)

दर्शना चौहान असे मार्शल क्लिनअप महिलेचे नाव आहे. दर्शना या आपल्या सहकर्मचाऱ्यांसोबत रेल्वे स्थानकाच्या परिसरात मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करत होत्या. त्यावेळी तेथे एक महिला मास्क न घातला थांबल्याचे त्यांनी पाहिले. या महिलेला मास्क का नाही घातला असे विचारले असता तिने दर्शना यांच्यासोबत वाद सुरु केला. या वादाचे रुपांतर अखेर मारहाणीमध्ये झाले.(Mumbai: कुर्ला येथील पादचारी पुलावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; झटापट कॅमेऱ्यात कैद Watch Video)

यापुढे दोघांच्या वादात आणखी दोन महिलांनी उडी घेत दर्शना हिला पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीवर प्रश्न थांबला नाही तर दर्शना यांच्या डोक्यात महिलांनी पेवर ब्लॉक घातला. यामुळे दर्शना यांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान, या प्रकरणी मारहणा करणाऱ्या महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना पोलिसांनी ताब्यात ही घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif