बारामती: शरद पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअमवर होणाऱ्या रणजी सामन्यांचे उद्घाटन; आज भिडणार महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड संघ

बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअमवर आजपासून रणजी क्रिकेटच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. तर स्टेडिअमवर खेळवण्यात येणारे सामने सुरु होण्यापूर्वी त्याचे याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

रणजी क्रिकेट सामने (Photo Credits-Twitter)

बारामती (Baramati) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअमवर आजपासून रणजी क्रिकेटच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. तर स्टेडिअमवर खेळवण्यात येणारे सामने सुरु होण्यापूर्वी त्याचे याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले आहे. रणजी क्रिकेट सामन्यांसाठी बीसीसीआयकडून परवानगी देण्यात आली आहे. 12 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान रणजी क्रिकेटचे सामने पार पडणार आहेत. महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड रणजी सामना खेळवला जाणार आहे.रणजी सामन्यांचे आयोजन होण्याच्या दृष्टीने शरद पवार यांच्या पुढाकाराने डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअमचे नुतनीकरण करण्यात आले

रणजी सामने खेळण्यासाठी बीसीसीआयने परवानगी दिली आहे. याबाबत अजित पवार यांनी ट्वीट केले आहे. ट्वीट करत असे म्हटले आहे की, बारामतीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअमवर आज महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड या रणजी सामन्याचे उद्घाटन करताना समाधान वाटले. प्रथम श्रेणी क्रिकेट सामने देशांत सर्वदूर आयोजित होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे.(भाजप ही देशावरील आपत्ती, काहीही करुन ती दूर करणे आवश्यक: शरद पवार)

भविष्यात या स्टेडिअमवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच मुंबईतील वानखेडे स्टेडिअम पेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मोठे असल्याचे सांगण्यात येत आहे . तर आज पहिला रणजी सामना रंगणार असून ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी हे खेळाडू सामन्यादरम्यान महाराष्ट्राचे प्रतिनिधत्व करणार आहेत.