कर्जत-कसारा येथून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी वाहतूकीची सोय करण्यात यावी- हायकोर्ट
तर घडाळ्याच्या काट्याप्रमाणे चालणारा मुंबईकर रेल्वेची वेळ चुकू नये म्हणून धावाधाव करताना दिसतो. तर कर्जत-कसारा येथून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे तर अगदी हालच होऊन जातात.
मुंबईतील लोकलने दरदिवसा हजारोंच्या संख्येने नागरिक प्रवास करतात. तर घडाळ्याच्या काट्याप्रमाणे चालणारा मुंबईकर रेल्वेची वेळ चुकू नये म्हणून धावाधाव करताना दिसतो. तर कर्जत-कसारा येथून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे तर अगदी हालच होऊन जातात. त्याचसोबत या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना दररोज सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कर्जत-कसारा येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी वाहतूकीची सोय करण्यात यावी असे हायकोर्टाने सुचवले आहे.
ठाणे येथील मेट्रो 4 प्रकल्पासाठी येथील महानगर पालिकेच्या हद्दीतील वृक्षतोडीच्या विरोधात जनहित याचिकांवरील सुनावणी पार पडली आहे. त्यामुळे आता येत्या 17 डिसेंबरला हायकोर्टाकडून निकाल येण्याची शक्यता आहे. यामुळे ठाणे येथे सुरु असलेल्या मेट्रो प्रकल्पासह अन्य 18 प्रकल्पांबाबत काय निर्णय दिला जाणार याकडे ठाणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
महापालिकेच्या हद्दीतील वृक्षतोड करण्यासाठी प्राधिकरण समितीकडून नियमानुसार सुचना आणि अन्य गोष्टींकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे याच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र वृक्षतोडीबाबत एमएमआरीडीने यावर उत्तर देत आम्ही सर्व नियम आणि परवानगी दिली असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. परंतु नव्याने लावलेली हजारो झाडे मृताव्यस्थेत झाली असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी लावला आहे.
तर भारतीय रेल्वे, स्टेशन आणि रुट यांच्या खासगीकरणासाठी काम सुरु झाले आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडलेल्या एका बैठकीत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडून खासगी ऑपरेटर्ससाठी 150 नवे मागे आणि रेल्वे संबंधित पुढील प्लॅन तयार करण्यास सांगितले आहे. या मार्गावरुन दुरांतो, तेजस आणि राजधानी एक्सप्रेस सारख्या प्रिमियम ट्रेन धावणार आहेत. त्यामुळे या रेल्वे खासगी ऑपरेटर्सच्या हाताखाली जाणार आहेत