Anganewadi Jatra 2020 Special Trains: आंगणेवाडीच्या भराडीदेवी जत्रेला आजपासून सुरूवात; मध्य रेल्वे कडून भाविकांसाठी 4 विशेष गाड्या; इथे पहा संपूर्ण वेळापत्रक
आजपासून सुरू झलेल्या भराडी देवीच्या जत्रेला जाणार्या भाविकांसाठी मुंबईत लोकमान्य टिळक (LTT) टर्मिनल्स, पनवेल (Panvel) ते कोकणात सावंतवाडी, थिवीम, करमाळी पर्यंत धावणार्या विशेष 4 गाड्यांची सोय करण्यात आली आहे.
Bharadi Devi Jatra 2020 Special Trains: दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असणार्या आंगणेवाडीच्या भराडी देवी जत्रेला आजपासून सुरूवात झाली आहे. त्यानिमित्त मालवणात जाणार्या भाविकांची मोठी गर्दी पाहता मध्य रेल्वेकडून विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. नवसाला पावणारी देवी अशी ओळख असणार्या या भराडी देवीची यात्रा ( Bharadi Devi Jatra) यंदा 17 फेब्रुवारीला भरणार आहे. दीड दिवसांच्या आंगणेवाडीतील भराडी देवीच्या उत्सवाला देशा-परदेशातून भाविक मोठी गर्दी करतात. मुंबई, पुणे शहरातून कोकणात यंदा भराडी देवीच्या उत्सवाला येणारी गर्दी पाहता मध्य रेल्वेने आंगणेवाडी जत्रा 2020 विशेष गाड्यांची सोय केली आहे. यामध्ये मुंबईत लोकमान्य टिळक (LTT) टर्मिनल्स, पनवेल (Panvel) ते कोकणात सावंतवाडी, थिवीम, करमाळी पर्यंत धावणार्या खास गाड्यांची सोय करण्यात आली आहे. या गाड्या 14 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान धावणार आहेत.
आंगणेवाडीच्या यंदाच्या जत्रेला 01161/01162 ही लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते सावंतवाडी ही स्पेशल ट्रेन 14 फेब्रुवारी दिवशी चालवली जाणार आहे. तर 01037 / 01038 ही एलटीटी ते सावंतवाडी रोड स्पेशल ट्रेन 17 फेब्रुवारी दिवशी चालवली जाणार आहे. तर 01157/01158 ही लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते थिविम विशेष ट्रेल 14 फेब्रुवारी दिवशी चालवली जाणार आहे. तर पनवेलहून कोकणात जाण्यासाठी पनवेल थिविम स्पेशल ट्रेन 15 15फेब्रुवारी दिवशी चालवली जाणार आहे. Anganewadi Bharadi Devi Jatra: आंगणेवाडीच्या भराडी देवी जत्रेबद्दल '8' खास गोष्टी.
आंगणेवाडी विशेष ट्रेन्सचं इथे पहा संपूर्ण वेळापत्रक
आंग़णेवाडीसोबतच मध्य रेल्वेकडून आता जानेवारी महिन्यातील लॉंग विकेंड स्पेशल गाड्यांचे वेळापत्रकदेखील जाहीर करण्यात आले आहे. या विशेष ट्रेन्ससोबतच नियमित धावणार्या ट्रेन्सदेखील आहेत मात्र कोकण रेल्वेमध्ये तिकिट बुकिंग चार महिने आधीच सुरू होत असल्याने अनेकदा ती अवघ्या काही क्षणांत हाऊसफुल्ल होतात. Anganewadi Bharadi Devi Jatra 2020: यंदा आंगणेवाडीच्या भराडीदेवी जत्रेला तुम्ही मालवण मध्ये कसे पोहचाल?
आंगणेवाडीच्या जत्रेबाबत सामान्यांसोबतच राजकारणी, कलाकार, खेळाडू देखील या जत्रेसाठी हजर राहतात. मागील वर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आंगणेवाडीच्या जत्रेला पोहचले होते तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर 18 खासदारांसह उद्धव ठाकरे भराडी देवीच्या दर्शनाला पोहचले होते. तर यंदा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेते आणि पदाधिकारी यांच्यासोबत आज दुपारी भराडी देवीच्या दर्शनाला पोहचणार आहेत.