अमरावती मधील मेळघाटासह अन्य परिसरातील नागरिकांचा पाण्यासाठी मैलांचा पायी प्रवास, सरकारने समस्येवर तोडगा काढण्याची मागणी
नागरिकांना पिण्याची पाण्याची सोय करण्यासाठी खडकाळ ठिकाणी काही मैल पायी चालत जाऊन पाणी आणावे लागत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील अमरावती मधील मेळघाटासह अन्य परिसरात पाणी टंचाईचा प्रश्न उद्धभू लागला आहे. नागरिकांना पिण्याची पाण्याची सोय करण्यासाठी खडकाळ ठिकाणी काही मैल पायी चालत जाऊन पाणी आणावे लागत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. तसेच पाणी आणण्यासाठी ऐवढा मैल चालत जाण्यायेण्यासाठीसंपूर्ण दिवस त्यात खर्चीक होत आहे. त्याचसोबत अस्वच्छ पाणी प्यायल्याने आजारी पडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने अमरावती मधील पाणी टंचाईची समस्या सोडवावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
विदर्भात उष्णतेची लाट आली असून नागरिक त्रस्त झाल आहेत. तर अमरावती येथे उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील विविध राज्यात उन्हाचा तडाखा येणाऱ्या काही काळात बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. देशात उष्णतेच्या लाटेमुळे काही ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.(Red Alert For Heat Wave: आयएमडीने जारी केला ‘या’ 5 राज्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट; तापमान 47 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता)
भारतीय हवामानशास्त्र विभागाने काही दिवसांपूर्वी म्हटले आहे की, उष्णतेच्या लाटेमुळे तीव्र उष्णता वाढत आहे व ही गोष्ट अशीच काही दिवस राहणार आहे. आयएमडीमते, वेस्टर्न डिस्टर्बेंस चा परिणाम 28 मेच्या रात्रीपासून दिसून येईल. यानंतर, जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो व त्यामुळे तापमान कमी होऊ शकते आणि पारा 38-39 अंशांपर्यंत पोहोचू शकतो. हवामान खात्याने सांगितले की, दिल्ली-एनसीआरमध्ये 29-30 मे रोजी प्रति तास 60 किमी वेगाने धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. आयएमडीने सांगितले आहे की, या आठवड्यात उत्तर भारतासह महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये तापमानात वाढ होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे विदर्भातील तापमान वाढू शकते.