Bank Fraud: सावधान! चुकूनही 'हा' मॅसेज उघडू नका, एका मिनिटात खाली होईल बॅंक अकाऊंट
संगणकावरील दस्तऐवज चोरी, व्हायरसच्या माध्यमातून धोका पोहोचवणे, बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे, वैयक्तिक मर्यादांचा भंग करणे, ऑनलाइन फसवणूक इत्यादी प्रकारची सायबर गुन्हेगारी प्रचंड फोफावली आहे.
इंटरनेटच्या वाढत्या प्रभावासोबतच सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही प्रचंड वाढत आहे. संगणकावरील दस्तऐवज चोरी, व्हायरसच्या माध्यमातून धोका पोहोचवणे, बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे, वैयक्तिक मर्यादांचा भंग करणे, ऑनलाइन फसवणूक इत्यादी प्रकारची सायबर गुन्हेगारी प्रचंड फोफावली आहे. यातच भारतीय कम्प्यूटर इमरजेन्साी रिस्पॉन्स टीमकडून देशातील नागरिकांना नव्या फ्रॉडबाबत इशारा दिला आहे. तसेच नागरिकांची फसवणूक करण्याआधी त्यांना पाठवल्या जाणाऱ्या एका मॅसेजबाबतही महत्वाची माहिती दिली आहे.
भारतीय कम्प्यूटर इमरजेन्सी रिस्पॉन्स टीमने बॅंक फ्रॉडबाबत ही माहिती दिली आहे. हॅकर्स बँकर असल्याचे सांगत खातेदारांना एका नव्या प्रकारच्या फिशिंग अटॅकमध्ये अडकवत आहेत. यासाठी फ्रॉडस्टर्स ngrok प्लॅटफॉर्मचा उपयोग करीत आहेत. युजर्सची संवेदनशील माहिती इंटरनेट बँकिंग क्रेटेंशियल, ओटीपी, फोन नंबर आणि इतरही गोष्टी मिळवण्यासाठी फिशिंग अटॅक केला जात असल्याचे सुरक्षा एजेन्सीने म्हटले आहे. हे देखील वाचा- Passport Renew Application: पासपोर्ट Re-Issue साठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज कसा कराल?
फसवणूक कशी केली जाते?
फसवणूकीचे जे मॅसेज खातेदारांना पाठवले जातात, त्यांचा शेवट ngrok.io होतो. दरम्यान, सायबर गुन्हेगार खातेदाराचे अकाऊंट सस्पेंड केले जाण्याची भिती दाखवतात. तसेच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन केव्हायसी वेरिफिकेशन करा, असेही मॅसेजद्वारे सांगतात. आपले बॅंक अकाऊंट बंद होण्याच्या मॅसेजला घाबरून अनेकजण फ्रॉडस्टर्सच्या जाळ्यात अडकतात. ज्यामुळे काही क्षणातच त्यांच्या खात्यातील पैसे गायब होतात.
महत्वाचे म्हणजे, बॅंकेकडून आलेल्या मॅसेजमध्ये एक युजर आयडी असतो, ज्यात सर्वसाधारणपणे बॅंकेचे शॉर्ट नाव असते. तर, सायबर गुन्हेगारांनी पाठवलेल्या मॅसेजमध्ये युजर आयडी नसून एक मोबाईल क्रमांक असतो. यामुळे नागरिकांनी अशाप्रकारच्या कोणत्याही मॅसेजला बळी पडू नये आणि कोणताही संशय आल्यास ताबडतोब आपल्या बँकेशी संपर्क साधावा.