अकोला: वर्गातील शुल्लक भांडणातून विद्यार्थ्याला भोकसले

अकोला (Akola) येथील एका शाळेतील दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले. या वादाचे प्रकरण एवढे टोकाला गेले की विद्यार्थ्यावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Image used for represenational purpose (File Photo)

अकोला (Akola) येथील एका शाळेतील दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले. या वादाचे प्रकरण एवढे टोकाला गेले की विद्यार्थ्यावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

वर्गातील एका शुल्लक कारणावरुन दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाले. शाळा सुटल्यानंतर प्रत्येकजण घरी जात होते. तर पातूर येथे जाणाऱ्या विद्यार्थ्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला. तेव्हा त्या विद्यार्थ्यावर चाकूने पाच ते सहा वार केले. मात्र चाकू हल्ला केलेल्या विद्यार्थ्याने घटनास्थळावरुन पळ काढला. तर जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर स्थानिक लोकांनी तातडीने रुग्णालयात उपचार दाखल केले. हल्ला करण्यात आलेला विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.(ठाणे न्यायालयात आरोपीने न्यायाधीशांना चप्पल मारून केला शिवीगाळ, वाचा नेमकं घडलं काय)

परंतु हल्लेखोर मुलाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. तसेच शाळेच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून पाहिले जात आहेत. त्याचसोबत नेमक्या कोणत्या कारणावरुन चाकूहल्ला करण्यात आला याबद्दल पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement