MPSC Recruitment 2021: महाराष्ट्रात 15,515 MPSC ची रिक्त पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता; अजित पवारांची विधिमंडळात माहिती

महाराष्ट्रात 2018 पासून रिक्त असलेली विविध श्रेणीतील रिक्त पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. राज्यातील एकूण 15,515 पदे भरण्यासाठी मान्यता देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केले.

Ajit Pawar (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पुण्यात एका 24 वर्षीय तरूणाने एमपीएससीच्या दिरंगाईला कंटाळून स्वतःचा जीव घेतल्याची सुन्न करणारी बातमी पाहून सरकार खडबडून जागं झालं आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळात काल अजित पवारांनी (Ajit Pawar) 31 जुलै पर्यंत एमपीएससीच्या सदस्यांची आणि आज 15,515 जागांसाठी भरतीला वित्त विभागाने मंजुरी दिल्याचं जाहीर केले आहे. दरम्यान 2018 पासून विविध श्रेणींमध्ये रिक्त असलेल्या जागांवर आता एमपीएससी (MPSC)  कडून लवकरच भरती होणार आहे.

महाराष्ट्रात एमपीएससी कडून गट अ, ब आणि क अशा तीन विविध श्रेणींमध्ये एकूण 15,515 जागा आहेत. अप्पर मुख्य सचिव वित्त विभागाकडून आता या भरती प्रक्रियेला हिरवा कंदील दिल्याने लवकरच रिक्त जागांवर नोकर भरतीची प्रक्रिया वेगवान होणार आहे. एमपीएससी निकालांचे प्रश्न देखील तातडीने सोडवण्यासाठी उपाय योजनांमध्ये ठोस निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

एमपीएससी मध्ये कोणत्या श्रेणीमध्ये किती जागा?

अ श्रेणी मध्ये 4417 जागा

ब श्रेणी मध्ये 8031 जागा

क श्रेणी मध्ये 3063 जागा

महाराष्ट्रामध्ये मागील वर्ष दीड वर्षामध्ये कोरोना संकट आणि मराठा आरक्षण रखडल्याने नोकरभरातीचा देखील वेग मंदावला आहे. अनेक विभागात परीक्षा झाल्या आहेत पण अद्यापही मुलाखती झालेल्या नाहीत. तर काहींची निवड झालेली आहे पण अद्याप नियुक्ती करण्यात आली नसल्याने तरूण मंडळी घरात बसून आहेत. अनेकांच्या नोकर्‍या कोरोना संकटात गेल्याने बेरोजगारी देखील वाढली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Maharashtra Guardian Ministers List: महाराष्ट्र सरकारकडून पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर; धनंजय मुंडे यांना मोठा धक्का, कोणत्या मंत्र्याकडे कोणता जिल्हा? वाचा संपूर्ण लिस्ट

BAN W vs NEP W, ICC Women's U19 T20 World Cup, 2025 Scorecard: अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकात बांगलादेशची विजयाने सुरुवात, नेपाळवर 5 विकेट्सने केली मात; सामन्याचा स्कोअरकार्ड येथे पाहा

Amravati Shocker: आधी लोखंडी सळ्यांचे चटके...मग लघवी पाजली, कुत्र्याची विष्ठा खायला लावली; काळी जादू केल्याच्या आरोपावरून 77 वर्षीय आदिवासी महिलेला गावकऱ्यांकडून मारहाण

Beed Shocker: बीडमध्ये गुन्हेगारी घटनांची मालिक सुरुचं! प्रेयसीने बोलणं बंद केल्याने संतापला बॉयफ्रेड; थेट गर्लफ्रेडच्या घरी जाऊन खिडकीतून केला गोळीबार

Share Now