Heart Attack Detection Project: आता AI च्या माध्यमातून Critical Heart Attacks चा धोका ओळखून उपचार शक्य; महाराष्ट्रात 12 जिल्ह्यांमध्ये 3000 रूग्णांना मिळाली तातडीची मदत

The STEMI Maharashtra Programme हा अकोला, औरंगाबाद, जालना, कोल्हापूर,नागपूर, नांदेड,नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा आणि ठाणे भागात आहे.

Heart | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Artificial Intelligence च्या माध्यमातून महाराष्ट्रात 12 तालुक्यामध्ये 3000

Critical Heart Attacks चं निदान करणं शक्य झालं आहे. यामुळे रूग्णांना ग्लोडन हार्वर मध्ये उपचार देखील देता आले. राज्य सरकार कडून AI-powered advanced diagnosis सुरू करण्यात आले आहे. याला ST-Elevation Myocardial Infarction (STEMI) detection project म्हणतात. फेब्रुवारी 2021 पासून त्याची सुरूवात झाली आहे. यामुळे हार्ट अटॅक द्वारा होणारे मृत्यू रोखण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्रात मृत्यूंच्या प्रमुख कारणांमध्ये हार्ट अटॅक अव्वल आहे.

फेब्रुवारी 2021 पासून 3000 severe heart attacks च्या रूग्णांना 4 मिनिटांत उपचार देणं शक्य झाले. यामध्ये प्रामुख्याने 70% पुरूष असल्याची माहिती देण्यात आली आहे.

STEMI हा फूल ब्लोन हार्ट अटॅक असतो. यामध्ये हृद्याच्या धमण्यात पूर्ण ब्लॉकेज मुळे रक्तप्रवाहात अडथळा आल्यास अटॅक येतो. अशा स्थितीत लवकर निदान आणि वेळेत उपचार मिळाल्यास रूग्ण वाचण्याची शक्यता अधिक असते. नक्की वाचा: Sudden Cardiac Arrest Awareness: भारतात हृदयविकाराच्‍या झटक्याच्‍या प्रमाणात वाढ होण्‍यामागे अनारोग्‍यकारक जीवनशैली व तणाव कारणीभूत; पहा हेल्दी हार्ट साठी Cardiologist ने दिलेल्या टीप्स .

‘Hub and Spoke’ मॉडेलच्या खाली बनवण्यात आलेल्या प्रोग्रॅम मध्ये ग्रामीण भागातील रूग्णालयात ईसीजी मशिन्स ही spokes म्हणून अपग्रेड करण्यात आली आहे. त्यांना 38 hubs सोबत लिंक करण्यात आली आहेत. जी जवळच्या हॉस्पिटल सोबत लिंक असतील. जेथे cath lab facility उपलब्ध असेल.

कसं काम करतं हे मॉडेल?

जेव्हा रूग्ण 'स्पोक' मध्ये येतो त्याचा मोफत तातडीने ईसीजी काढला जातो. त्याचा रिपोर्ट क्लाऊड मध्ये अपलोड केला जातो. त्या सोबत हब्स चे तज्ञ जोडलेले असतात. त्यामुळे हा हार्ट अटॅक आहे की नाही याचं निदान केले जातं. याचा टर्नआऊट टाईम 10 मिनिटांचा असतो. डॉक्टर्स सामान्यपणे 4 मिनिटांत प्रतिसाद देत असल्याचं Dr Padmaja Jogewar, Joint Director (Non-Communicable Disease cell) of Directorate of Health Services म्हणाल्या आहेत.

22 नोव्हेंबर पर्यंत ECG reports द्वारा 7377 अत्यावस्थ रूग्णांचे निदान झाले आहे तर 2722 रूग्णांना severe STEMI heart attack चा धोका होता. त्यांना तातडीने thrombolysis औषध देण्यात आले आणि यामुळे रक्त प्रवाह सुरळीत करण्यास मदत होते. यामुळे टिश्यू आणि ऑर्गन यांना होणारा त्रास कमी करण्यास मदत होते.

The STEMI Maharashtra Programme हा अकोला, औरंगाबाद, जालना, कोल्हापूर,नागपूर, नांदेड,नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा आणि ठाणे भागात आहे.

याच कालावधीत, या केंद्रांवर 2.77 लाख Referred Patients मध्ये 3.08 लाख ईसीजी घेण्यात आले. आकडेवारीनुसार, 10 पैकी जवळपास सात रुग्ण पुरुष होते, जे दर्शविते की त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif