सोयाबीनचं बियाणं न उगवल्याने शेतकऱ्यांनी केल्या तक्रारी; सदोष बियाणे तक्रारींची तातडीने तपासणी करण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश
त्यामुळे सदोष बियाणे तक्रारींची तातडीने तपासणी करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी दिले आहेत. यासाठी सोयाबीन शास्त्रज्ञ आणि कृषि विभागातील अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. सदोष बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याच्या सुचनादेखील भुसे यांनी यावेळी दिल्या आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे (Soybean Seeds) उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे सदोष बियाणे तक्रारींची तातडीने तपासणी करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी दिले आहेत. यासाठी सोयाबीन शास्त्रज्ञ आणि कृषि विभागातील अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. सदोष बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याच्या सुचनादेखील भुसे यांनी यावेळी दिल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून दादाजी भुसे राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे-खते उपलब्ध व्हावेत यासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी बीड, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करत असताना शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या. त्यामुळे भुसे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीनची पाहणी केली. सदोष बीयाणांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशा सुचनाही भुसे यांनी यावेळी दिल्या. आज कृषिमंत्र्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा या भागाचा दौरा केला. पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असंही आवाहनदेखील कृषिमंत्र्यांनी यावेळी केलं. (हेही वाचा - महावितरण कर्मचा-यांचा COVID-19 मुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांना मिळणार 30 लाखांचे सानुग्रह अनुदान- डॉ. नितीन राऊत)
दरम्यान, कृषिमंत्र्यांनी उस्मानाबाद, सोलापूर येथे घेतलेल्या कृषि आढावा बैठकांमध्ये कृषि अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका, अशा सुचना दिल्या. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी महाबीजचे सोयाबीन बियाणे पेरले असून ते उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. अशा तक्रारीची तातडीने दखल घेऊन तपासणी अहवालाची वाट न पाहता बियाणे बदलून देण्यात यावेत, अशा सुचनाही कृषिमंत्र्यांनी केल्या आहेत.