मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाची 74% मालकी अडाणी समुहाकडे

नियामक फआयलिंगमध्ये म्हटले आहे की, अडाणी समूह मुंबई विमानतळावर एअरपोर्ट कंपनी ऑफ साऊथ अफ्रीका (CCI) तथा बिडवेस्टची 23.5% भागिदारी अधिग्रहीत करण्यासाठी पावले टाकेन. तसेच, त्यासाठी भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (CCI) द्वारा मान्यता मिळाली आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर जीव्हीकेच्या 50-50 भागिदारीसोबत मुंबई विमानतळात अडाणी समूहाची भागीदारी 74% इतकी होणार आहे.

The Mumbai International Airport | (Photo Credits: PTI)

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport ) आता अडाणी समुहाकडे (Adani Group) जाणार आहे . आडाणी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (SSHL) मुंबई विमानतळाची जीव्हीके (GVK ) एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेडची भागिदारी अधिग्रहन करेन. या अधिग्रहनानंतर मुंबई विमानतळावर अडाणी समुहाच्या भागिदारीत वाढ होऊन ती 74 % इतकी होणार आहे. शेअर बाजाराला सोमवारी पाठविण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, आडाणी समूहाच्या प्रमुख होल्डिंग कंपनी एएएचएल ने मंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडमध्ये जीव्हीके ऋण अधिग्रहण करार केला आहे. हे ऋण इक्विटीमध्ये बदलले जाईल.

जीव्हीके समूह आणि एएएचएलने समहती व्यक्त करत म्हटले आहे की, एएएचएल जीव्हीके पॉवर आणि इन्फ्रास्ट्रक्च र लिमिटेड द्वारा देण्यात आलेल्या गॅरेंटी जारी करण्यासाठी जीव्हीके सोबत एक स्टँड-स्टिल पॅक्ट सादर करेन.

नियामक फआयलिंगमध्ये म्हटले आहे की, अडाणी समूह मुंबई विमानतळावर एअरपोर्ट कंपनी ऑफ साऊथ अफ्रीका (CCI) तथा बिडवेस्टची 23.5% भागिदारी अधिग्रहीत करण्यासाठी पावले टाकेन. तसेच, त्यासाठी भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (CCI) द्वारा मान्यता मिळाली आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर जीव्हीकेच्या 50-50 भागिदारीसोबत मुंबई विमानतळात अडाणी समूहाची भागीदारी 74% इतकी होणार आहे. (हेही वाचा, TikTok खरेदी करण्याबाबत गूगलचा विचार काय? सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केली भूमिका)

दरम्यान, अडाणी समूहाने म्हटले आहे की, जीव्हीके एडीएलच्या अधिग्रहणानंतर आवश्यक त्या पारंपरीक आणि नियामकीय मान्यता मिळविण्यासाठी पावले टाकली जातील. ज्यामुळे विमानतळावर नियंत्रक भागिदारी अधिग्रहीत करता येईल.

जीव्हीकेचे संस्थापक चेअरमन जीव्हीके रेड्डी यांनी म्हटले आह की, कोविड 19 संकटामुळे विमानसेवा क्षेत्राला मोठा फटकका बसला आहे. त्यामुळे हा उद्योग अनेक वर्षांनी मागे गेला आहे त्यामुळे मुंबई विमानतळ आर्थिक स्थिती प्रचंड कठीण बनली आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, जीव्हीके ने अडाणी सोबत सहकार्य करण्यासाठी सहमती दिली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now