11 वी प्रवेशप्रक्रियेमध्ये यंदा महाराष्ट्र बोर्ड SSC च्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र तुकडी द्या - युवासेनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Yuvasena (Photo Credits: Facebook)

Maharashtra Board SSC Students Internal Marks Issue: यंदा महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल गडगडल्याने अकरावी प्रवेशप्रक्रियेमध्ये ICSE, CBSE, IB बोर्ड विद्यार्थ्यांच्या तुलनेत स्टेट बोर्डाची मुलं मागे पडतील अशी भीती विद्यार्थी आणि पालकांच्या मनात निर्माण झाली आहे. महाराष्ट्र बोर्डाने अंतर्गत गुण निकालामध्ये समाविष्ट न केल्याने हा गोंधळ झाला आहे. त्यामुळे विनाकारण 11 वी साठी ज्युनियर कॉलेजची प्रवेशप्रक्रिया लांबवण्यापेक्षा त्यामधून सुवर्णमध्य काढण्यासाठी युवासेनेचे पदाधिकारी आणि नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांची भेट घेतली आहे. महाराष्ट्र बोर्ड 10 वीचा निकाल 77.10%; यंदाही मुलींची बाजी

युवासेनेच्या मागण्या

युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवार (12 जून) रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रस्ताव मांडला. आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांना हा प्रस्ताव पटल्याची माहिती दिली आहे. राज्य सरकारच्या अख्यत्यारित असल्याने यंदा ज्युनियर कॉलेजमध्ये जागा वाढवण्याबाबत शालेय मंत्री विनोद तावडे यांच्याशी बोलल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे.राखीव कोट्यात आरक्षणाचा फायदा मिळवण्यसाठी ही 5 सरकारी कागदपत्र ठेवा तयार

दरम्यान काही दिवसांपूर्वी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, विनोद तावडे HRD मंत्रालयाशी बोलून इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे केवळ लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य धरत अ‍ॅडमिशन प्रक्रिया सुरू करण्याबाबत विनंती करणार होते.