Pune: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचे अपहरण करून बलात्कार; आरोपीला अटक

यावेळी एका अज्ञात तरुणीने तिचा पाठलाग केला. त्यानंतर आरोपीने पीडितेला मारहाण करून जबरदस्तीने गाडीवर बसवले. पीडितेला निर्जन ठिकाणी नेऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.

Rape | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Pune: पुणे शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील विश्रांतवाडी परिसरात (Vishrantwadi Area) कॉल सेंटरमध्ये (Call Center) काम करणाऱ्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार (Rape) करण्यात आला. पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित तरुणी रात्रीच्या सुमारास कॉल सेंटरमधील ड्युटी संपल्यानंतर घरी जात होती. यावेळी एका तरुणाने तिचे अपहरण केले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी रात्री खराडी परिसरातील कॉल सेंटरमध्ये ड्यूटी संपल्यानंतर पीडित तरुणी आपल्या घरी जात होती. यावेळी एका अज्ञात तरुणीने तिचा पाठलाग केला. त्यानंतर आरोपीने पीडितेला मारहाण करून जबरदस्तीने गाडीवर बसवले. पीडितेला निर्जन ठिकाणी नेऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गुरुवारी पहाटे तिला येरवडा येथील एका चौकात सोडले. तरुणीने आपल्या मित्राला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. (हेही वाचा - Maharashtra: पिंपरी चिंचवडमधील 26 वर्षीय एअर होस्टेसवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक; Tinder ऑनलाईन डेटिंग अ‍ॅपवर झाली होती ओळख)

दरम्यान, तरुणीने आपल्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी संबंधित ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात पोलिसांना आरोपीची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आणि पीडितेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला गडाआड केलं. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (वाचा- Jalgaon: प्रेमविवाह करुन सासरी गेलेल्या तरुणीचा दुसऱ्या दिवशीचं संशयास्पद मृत्यू; पतीनेही विषारी औषध घेऊन संपवलं जीवन)

गेल्या आठवड्यात पुण्यातील पिंपरी चिंचवड मधील 26 वर्षीय एअर होस्टेसवर बलात्कार करण्यात आला होता. पीडित तरुणी आणि आरोपी टिंडर या ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून भेटले होते. आरोपीने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार करत मारहाण केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif