Jalgaon: प्रेमविवाह करुन सासरी गेलेल्या तरुणीचा दुसऱ्या दिवशीचं संशयास्पद मृत्यू; पतीनेही विषारी औषध घेऊन संपवलं जीवन

आरती आणि प्रशांत एकमेकांवर प्रेम करत होते. त्यानंतर या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. लग्नाच्या काही दिवसानंतर हे दोघे घरी परतले होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबात मोठा वाद झाला होता.

Jalgaon: प्रेमविवाह करुन सासरी गेलेल्या तरुणीचा दुसऱ्या दिवशीचं संशयास्पद मृत्यू; पतीनेही विषारी औषध घेऊन संपवलं जीवन
Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

Jalgaon: जळगाव जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमविवाह करुन सासरी गेलेल्या तरुणीचा दुसऱ्या दिवशीचं संशयास्पद मृत्यू झाला. विशेष म्हणजे पत्नीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर पतीनेही विषारी औषध घेऊन आपलं जीवन संपवलं. धरणगाव तालुक्यातील पाळधी गावामध्ये ही घटना घडली. संशयास्पद मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आरती असं असून तिच्या मृत पतीचं नाव प्रशांत पाटील असं आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरतीचे सासरे विजयसिंग पाटील, मृत प्रशांतचे मित्र विकास धर्मा कोळी, विक्की उर्फ विजय संतोष कोळी या तिघांना अटक केली आहे. या संपर्ण प्रकारामुळे पाळधी गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, आरती आणि प्रशांत एकमेकांवर प्रेम करत होते. त्यानंतर या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. लग्नाच्या काही दिवसानंतर हे दोघे घरी परतले होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबात मोठा वाद झाला होता. त्यानंतर हा वाद मिटला होता. परंतु, सासरी गेल्यानंतर दुसऱ्याचं दिवशी आरतीचा संशयास्पद मृत्यू झाला. आरतीची सासरच्या लोकांनी हत्या केली असल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. (हेही वाचा - बीड: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर 27 वर्षीय तरुणाने तलवारीने केला जीवघेणा हल्ला, तरुणी गंभीर जखमी)

प्राथमिक अंदाजानुसार, विषबाधा झाल्याने आरतीचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. आरतीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर प्रशांतने विषारी औषध प्राशन केलं. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान प्रशांतचा मृत्यू झाला. आरती आणि प्रशांतने दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन लग्न केलं होतं. परंतु, केवळ एका आठवड्याचं आरतीचा संशयास्पद मृत्यू झाला. तर प्रशांतने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

राज्यात कोरोना विषाणूचं संकट अद्याप कमी झालेलं नाही. अशात अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. परिणामी प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. यापूर्वी राज्यात प्रेमविवाह केल्यानंतर प्रेमी युगुलांच्या हत्येच्या अनेक घटना घडल्या आहेत. 2018 मध्ये बीड जिल्ह्यामध्ये बहिणीने प्रेम विवाह केला या रागातून भावाने आपल्या मित्राच्या मदतीने बहिणीच्या पतीची भररस्त्यावर निर्घृण हत्या केली होती.

(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2021 11:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).